महाराष्ट्र

maharashtra

लिबियात अपहरण झालेल्या सात भारतीयांची सुटका

By

Published : Oct 12, 2020, 7:21 AM IST

लिबियामध्ये गेल्या महिन्यात सात भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते. या सर्वांची सुटका करण्यात आल्याची माहिती ट्युनिशियामधील भारतीय राजदूताने रविवारी दिली. हे सात भारतीय आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील होते.

7 Indian nationals kidnapped in Libya released
लिबियात अपहरण झालेल्या सात भारतीयांची सुटका

ट्यूनिस : लिबियामध्ये गेल्या महिन्यात सात भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते. या सर्वांची सुटका करण्यात आल्याची माहिती ट्युनिशियामधील भारतीय राजदूताने रविवारी दिली. हे सात भारतीय आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील होते. या सर्वांचे लिबियातील अशवरीफ या ठिकाणावरून 14 सप्टेंबरला अपहरण झाले होते.

लिबियामध्ये भारताचा दूतावास नाही. त्यामुळे, ट्युनिशियामधील भारताचे राजदूत पुनीत रॉय कुंडल लिबियातील व्यवहारही पाहतात.

देशातील सात लोकांचे अपहरण झाल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे सातही नागरिक सुरक्षित असल्याचे सांगितले होते. तसेच, त्यांच्या सुटकेसाठी ट्युनिशिया सरकार आणि लिबिया सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

लिबियामध्ये सध्या गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे लिबिया प्रवासासंबधित परिपत्रक 2015मध्ये भारत सरकारने जारी केले होते. तेथील प्रवास टाळावा, असे पत्रकात म्हटले होते. त्यानंतर 2016मध्ये सरकारने लिबिया प्रवासावर प्रतिबंध लावला होता.

हेही वाचा :थायलंडमध्ये बस-ट्रेनच्या धडकेत 17 ठार

ABOUT THE AUTHOR

...view details