महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 2, 2023, 5:41 PM IST

ETV Bharat / entertainment

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौकच्या टीमला दिला आशीर्वाद!

चौक हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असताना बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमासोबत होणारी टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. चौकच्या टीमचे या कृतीमुळे सर्वत्र कौतुक झाले. दरम्यान चौक टीमने छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आणि त्यांनी चित्रपटाचे कथानक समजून घेऊन टीमचे कौतुक करत आशीर्वादही दिले.

Etv Bharat
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौकच्या टीमला दिला आशीर्वाद

मुंबई - नुकतीच चौकच्या टीमला शाबासकी मिळाली होती कारण त्यांनी बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाशी टक्कर होऊ नये यासाठी त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले होते. आता चौकच्या टीमच्या पाठीवर पुन्हा एकदा शाबासकीची थाप पडली आहे. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ती दिली आहे. त्याचे झाले असे की, चौक चे नवीन पोस्टरचे उद्घाटन करायचे होते. तर, त्या पोस्टरचे अनावरण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्याचे ठरले. सगळे सोपस्कार झाल्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर अनावरीत करण्यात आले. साताऱ्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन 'चौक'च्या सर्व कलाकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी 'चौक'च्या टीमला आशीर्वाद दिले आणि कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौकच्यापोस्टरचे अनावरण केले

छत्रपती उदयनराजे भोसले यांचा चौकच्या टीमला आशीर्वाद- लेखक व दिग्दर्शक देवेंद्र अरुण गायकवाड यांनी जेव्हा चित्रपटाचा टीझर, ट्रेलर व चित्रपटाचे पोस्टर दाखवले तेव्हा छत्रपती उदयनराजे यांना ते खूप भावले आणि त्यांनी तल्या मारून दाद दिली. ते इतके प्रभावित झाले की त्यांनी या चित्रपटाचे कथानक आणि आशय याबाबत चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि आता सामाजिक कार्यात गुंतलेल्या उदयनराजे भोसले यांनी चित्रपटातून समाज प्रबोधन होत असल्याचे बघून देवेंद्र गायकवाड यांची स्तुती केली. 'चौक' चे प्रमुख पोस्टर अनावरीत झाल्यावर चित्रपटाच्या कलाकारांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी किरण गायकवाड, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे आणि देवेंद्र गायकवाड हे यावेळी उपस्थित होते. तर, पंकज चव्हाण हे ही यावेळी उपस्थित होते. छत्रपतींनी चित्रपटाच्या सर्व टीमला आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौकच्या टीमला दिला आशीर्वाद

चौक चित्रपटाची रिलीज तारीख - अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी ‘चौक’ची निर्मिती केली असून, महावीर होरे प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड आहेत. अभिनेते देवेंद्र गायकवाड या चित्रपटामार्फत दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चौकच्या टीमला दिला आशीर्वाद

हेही वाचा -Met Gala 2023 : मेटॅलिक गाऊनमध्ये नताशा पूनावालाचा लूक; शेअर केली लूकची झलक

ABOUT THE AUTHOR

...view details