महाराष्ट्र

maharashtra

आर माधवनने शेअर केले 'रॉकेटरी'चे नवीन पोस्टर

By

Published : Jun 20, 2022, 7:42 PM IST

अभिनेता आर. माधवनने त्याच्या आगामी 'रॉकेटरी-नंबी इफेक्ट 1' या चित्रपटाचे नवीन पोस्टर त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. हा अभिनेता इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या बायोपिकचे दिग्दर्शनही करत आहे.

आर माधवनने शेअर केले 'रॉकेटरी'चे नवीन पोस्टर
आर माधवनने शेअर केले 'रॉकेटरी'चे नवीन पोस्टर

मुंबई - अभिनेता आर माधवनने 'रॉकेटरी' द नंबी इफेक्ट या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या नवीन पोस्टरबद्दल त्याने कॅप्शनमध्ये त्याने दोन ओळींमध्ये वैज्ञानिकाबद्दल सांगितले आहे. नवीन पोस्टरमध्ये अभिनेता वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अभिनेत्याने नवीन पोस्टर शेअर केले आणि लिहिले- 'अनेक अपूर्ण लोक एक परिपूर्ण जग बनवण्याचा प्रयत्न करत आहेत'. #Rocketrythefilm ही कथा एका महान शास्त्रज्ञाची, खऱ्या देशभक्ताची, ज्याला एका क्षणी खलनायक ठरवले जाते.'' यासोबतच त्याने चित्रपटगृहात चित्रपटाच्या रिलीजची तारीख (1 जुलै 2022) देखील लिहिली आहे.

'रॉकेटरी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही आर. माधवन करत आहेत. यासोबतच तो वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या भूमिकेतही दिसणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता आर. माधवनने चित्रपटात बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर हा चित्रपट बनवला जात आहे. जो 1 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अनेक खास गोष्टी आहेत. जसे बॉडी ट्रांस्फॉर्मेशन तसेच आर. माधवन पहिल्यांदाच दिग्दर्शन करत आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात आर. माधवन पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. एवढेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार, 'रॉकेटरी' चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सात महिने काम केल्यानंतर आर. माधवनने पुन्हा कथा लिहिली होती. त्याचबरोबर या चित्रपटाचे शूटिंग भारतासह अनेक देशांमध्ये झाले आहे. सर्बिया, रशिया, जॉर्जिया, फ्रान्स आणि कॅनडा या देशांचा यात समावेश आहे.

हेही वाचा -अनुपम खेर यांनी 'द सिग्नेचर' या ५२५ व्या चित्रपटाचे शूटिंग केले पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details