ETV Bharat / entertainment

कमल हासन स्टारर 'इंडियन 2'चा प्री रिलीज इव्हेंट होणार 'या' दिवशी - indian 2 pre release event - INDIAN 2 PRE RELEASE EVENT

Indian 2 Pre Release Event : सेनापती कमल हासन 'इंडियन 2'द्वारे धमाका करण्यासाठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट हा हैदराबादमध्ये होणार आहे.

Indian 2 Pre Release Event
इंडियन 2 प्री रिलीज इव्हेंट ((IMAGE- IANS/MOVIE POSTER))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 2:19 PM IST

मुंबई - Indian 2 Pre Release Event : साऊथ सुपरस्टार कमल हासन अभिनीत मोस्ट अवेटेड चित्रपट 'इंडियन 2' रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे. कमल हासन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांनी 'इंडियन' चित्रपटाचा सीक्वेल 28 वर्षानंतर बनवला आहे. आता कमल हासनचे चाहते 'इंडियन 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 'इंडियन 2' 12 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याआधी, चित्रपटाचा एक प्री-रिलीज इव्हेंट असेल, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. इंडियन 2 चे निर्माते, लाइका प्रोडक्शननं आज 6 जुलै रोजी 'इंडियन 2 'च्या प्री-रिलीज इव्हेंटबद्दल माहिती शेअर केली आहे.

प्री-रिलीज 'इंडियन 2' चित्रपट : प्री-रिलीज कार्यक्रम 7 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता एन कन्व्हेन्शन सेंटर, हैदराबाद येथे होणार आहे. ही पोस्ट शेअर करत लाइका प्रॉडक्शननं लिहिलं आहे की, "नुकताच 'इंडियन 2'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये कमल हासन भ्रष्टाचार संपवताना वेगवेगळ्या अवतारात दिसत आहेत. 'इंडियन 2' चित्रपटाची कहाणी देशात चालत असणाऱ्या भ्रष्टाचारावर आहे. एस. शंकरचे जवळपास सर्वच चित्रपट राजकीय भ्रष्टाचार, खराब सरकारी व्यवस्था आणि नागरी जबाबदारी यावर आधारित असतात. आता 'इंडियन 2' चित्रपटाला प्रेक्षक किती प्रेम देणार हे पाहाणे लक्षणीय असणार आहे.

'इंडियन 2'ची स्टार कास्ट : या चित्रपटात कमल हासन व्यतिरिक्त काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, सिद्धार्थ नारायण, ब्रह्मानंदम, नेदुमुदी वेणु, वेन्नेला किशोर, गुलशन ग्रोवर, पीयूष मिश्रा हे स्टार्स आहेत. दरम्यान 'इंडियन 2चा ट्रेलर खूप धमाकेदार असून अनेकांना कमल हासन भ्रष्टाचार संपवताना यात दिसत आहे. दरम्यान 'इंडियन' हा चित्रपट 1996मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यावेळी अनेकांना आवडला होता. रुपेरी पडद्यावर या चित्रपटानं भरपूर कमाई केली होती. तसंच कमल हासनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'कल्की 2898 एडी' हा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारनं रणवीर सिंगला त्याच्या 39व्या वाढदिवसानिमित्त दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा - akshay wishes birthday ranveer
  2. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY
  3. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचा 'संगीत सोहळा' संपन्न - sangeet ceremony

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.