महाराष्ट्र

maharashtra

साऊथचे चित्रपट ठरताहेत गेम चेंजर, भाषा नाही तर आशय महत्त्वाचा : मृणाल ठाकूर

By

Published : Jun 10, 2022, 2:08 PM IST

अभिनेत्री मृणाल ठाकूर ( Mrunal Thakur ) साऊथ स्टार दुल्कर सलमानसोबत ( Dulquer Salmaan ) तेलुगू चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'सीता रामम' ( Sita Ramam ) या चित्रपटात ती काम करीत आहे. साऊथचे चित्रपट गेम चेंजर ठरत असल्याचे तिने म्हटलंय.

मृणाल ठाकूर
मृणाल ठाकूर

मुंबई- अभिनेत्री मृणाल ठाकूर ( Mrunal Thakur ) 'सीता रामम' ( Sita Ramam ) या चित्रपटातून साऊथ स्टार दुल्कर सलमानसोबत ( Dulquer Salmaan ) तेलुगू चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मृणाल ठाकूरला वाटते की गेल्या काही वर्षांत दक्षिण भारतीय चित्रपट कोरोना महामारीच्या नंतर प्रेक्षकांमध्ये नवीन आशयाची गोडी लावणारा एक गेम चेंजर म्हणून उदयास आला आहे. प्रेक्षक चांगल्या आशयालाच प्रधान्य देतात त्यामुळे भाषा कुठली आहे याने काही फरक पडत नसल्याचेही मृणालला वाटते.

'सीता रामम' पोस्टर

यावर भाष्य करताना अभिनेत्री मृणाल म्हणाली, "जेव्हा कोणी भारतीय चित्रपटांबद्दल बोलतो, तेव्हा प्रथम बॉलीवूड आणि हिंदी संगीताचा विचार करण्याची शक्यता असते. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये आणि कोविड-19 महामारीच्या काळात ते काहीसे प्रादेशिक म्हणून बदलले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सौजन्याने सिनेमा मोठ्या प्रमाणात पावले टाकतो आहे."

"साऊथ सिनेमा, विशेषतः गेल्या काही वर्षांत गेम चेंजर ठरला आहे आणि त्याने अभूतपूर्व आशय सामग्री दिली आहे याबद्दल दुमत नाही. 'बाहुबली', 'केजीएफ: चॅप्टर 2' सारखे चित्रपट नक्कीच गेम चेंजर आहेत. दक्षिण भारतीय सिनेमे पण संपूर्णपणे, आता जगभरात व्यापक प्रमाणात पोहोचत आहेत,” ती पुढे म्हणाली.

'सीता रामम' बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट युद्धाची पार्श्वभूमी असलेला रोमँटिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि त्याचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे.

हेही वाचा -प्रियंका चोप्राने शेअर केला २२ वर्षांपूर्वीचा बिकीनीतील फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details