महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2022, 2:45 PM IST

ETV Bharat / entertainment

'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील जबरदस्त गाणे 'देवा देवा' झाले लॉन्च!!

ब्रह्मास्त्रमधील ( Brahmastra Part One: Shiva ) बहुप्रतीक्षित देवा देवा गाणे ( Deva Deva song ) निर्माता अयान मुखर्जीने ( Ayan Mukerji ) लॉन्च केले आहे. प्रीतमने संगीतबद्ध केलेले देवा देवा हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे तर या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. यैा गाण्यातून रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत त्याच्या शक्तीचा शोध घेत आहे हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे.

Brahmastra song Deva Deva
देवा देवा गाणे लॉन्च

मुंबई- केशरिया ( Kesariya ) या रोमँटिक गाण्यानंतर निर्माता अयान मुखर्जीने ( Ayan Mukerji ) सोमवारी त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ब्रह्मास्त्रमधील दुसरे गाणे 'देवा देवा' ( Deva Deva ) लॉन्च केले आहे. हे नवीन गाणे 'ब्रह्मास्त्र भाग एक शिवा' ( Brahmastra Part One: Shiva ) चित्रपटाचा आत्मा असल्याचे मानले जात आहे. प्रीतमने संगीतबद्ध केलेले देवा देवा हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे तर या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.

या गाण्यात रणबीर कपूर मेगास्टार अमिताभ बच्चनसोबत त्याच्या शक्तीचा शोध घेत आहे हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. रणबीरने साकारलेला शिवा बाहेरील आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथम त्याला आतल्या आगीची जाणीव करून देऊन त्याची क्षमता कशी साध्य करतो हे देवा देवा गाण्याने दाखवले आहे.

जूनमध्ये अयान मुखर्जीने चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ब्रह्मास्त्र चित्रपट जाहीर झाल्यापासूनच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. पौराणिक-काल्पनिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे गेल्या आठ वर्षांपासून काम सुरू आहे. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया भट्ट आणि रणबीर प्रेमात पडले होते. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला 14 एप्रिल रोजी दोघांनी लग्न केले.

रणबीर, आलिया आणि अयान सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेले आहेत. ब्रह्मास्त्र भाग एक: शिवा 9 सप्टेंबर, 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्य यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश 'मन कस्तुरी रे' चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण

ABOUT THE AUTHOR

...view details