महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2023, 10:39 AM IST

ETV Bharat / entertainment

Amruta Fadnavis Patriotic Song : पंजाबी गाण्याच्या यशानंतर अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात मिळाला गाण्याचा ब्रेक

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांच्या नवीन पंजाबी गाण्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाल्यानंतर रिल स्टार रियाझ अलीसोबत 'आज मूड बना लिया' या गाण्यावर रिल शेअर केला होता. आता त्या पाठोपाठ प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून एक देशभक्तीपर गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Amruta Fadnavis patriotic song
अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात मिळाला गाण्याचा ब्रेक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिले आहे. अमृत फडणवीस यांना 'आज मूड बना लिया' या गाण्याच्या उदंड प्रतिसादानंतर थेट चित्रपटात गाण्याचा ब्रेक मिळाला आहे. सध्या सगळीकडे अमृता फडणवीस यांच्या नव्या रिलची चर्चा जोरदार सुरू आहे. आगामी चित्रपटासाठी अमृता यांनी 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा' हे देश भक्तीपर गाण गायले आहे. 'भारतीयन्स' हा बहुभाषिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याचा व्हिडिओ ट्रेलर अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यात त्या पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत.

‘भारतीयन्स’ बहुभाषिक चित्रपट :या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत अमृता फडणवीस यांनी लिहिले, 'तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा! आगामी ‘भारतीयन्स’ या बहुभाषिक चित्रपटासाठी ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गाणे गायला मिळाले. हा मोठा सन्मान होता. सत्य कश्यप यांचे अंगावर शहारा आणणारे हे संगीत सर्वांनी ऐकायलाच हवे.' अमृता फडणवीस त्यांच्या अनोख्या फॅशन सेन्स आणि मधुर आवाजमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. तसेच त्या राजकीय टोलेबाजीमुळेदेखील प्रसिद्ध आहेत. अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सामाजिक विषयांवर त्यांचे मत त्या परखडपणे मांडताना दिसतात.

गाण्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती :अमृता फडणवीस यांच्या गाण्याला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळत असतो. त्यात त्यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गाण्याला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली आहे. अमृता फडणवीस यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे. याआधी 'आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!' या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलीच पसंती मिळाली होती. या गाण्यावर रिल स्टार रियाझ आली याच्यासोबत तयार केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान प्रसिद्ध झाला होता. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्या नव्या व्हिडीओवर अनेक युजर्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. 'भारतीयन्स' (BHARATEEYANS) हा बहुभाषिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी 'सारे जहाँसे अच्छा हिंदोस्तां हमारा'हे देश भक्तीपर गाणे गायले आहे. या गाण्याची झलक अमृता यांनी आपल्या प्रेक्षकांना दाखवली आहे.

हेही वाचा :'श्यामची आई' चित्रपट आता ब्लॅक अँड व्हाईटमधून होणार प्रदर्शित; पोस्टर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details