महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 31, 2021, 3:45 PM IST

ETV Bharat / city

ठाणे मनपातील कंत्राटदार विकास दाभाडेंनी करोडो रुपयांची ऑफर केल्याचा सोनू जालानचा आरोप

ठाण्यात काल दाखल केलेल्या करोडो रुपयांच्या खंडणी प्रकरणात माझे नाव घेऊ नको, असे आवाहन करत या मोबदल्यात करोडो रुपये देऊ केल्याचा आरोप तक्रारदार सोनू यांनी केला आहे . मी गुन्हा दाखल करण्यासाठी जात असताना ठाण्यातील कंत्राटदार असलेल्या विकास दाभाडे यांनी फोन करून फोनवर करोडो रुपयांचे आमिष दाखवले असल्याचा खुलासा सोनू जलान यांनी केला आहे.

सोनू जालान (तक्रारदार)
सोनू जालान (तक्रारदार)

ठाणे - ठाण्यात नुकताच करोडो रुपयांच्या खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये माझे नाव घेऊ नको, असे आवाहन करत या मोबदल्यात करोडो रुपये देऊ केल्याचा आरोप तक्रारदार सोनू यांनी केला आहे. मी गुन्हा दाखल करण्यासाठी जात असताना ठाण्यातील कंत्राटदार असलेल्या विकास दाभाडे यांनी फोन करून फोनवर करोडो रुपयांचे आमिष दाखवले असल्याचा,आरोप सोनू जालान यांनी केला आहे.

ठाणे मनपातील कंत्राटदार विकास दाभाडेने मला तक्रार करू नये म्हणून करोडो रुपये ऑफर केले आहेत, असा आरोप येथील सोनू जालान यांनी केली आहे.

'भाजपच्या तिकिटावर पालिकेची निवडणूकही लढवली'

विकास दाभाडे हे ठाणे महानगरपालिकेत कंत्राटदार आहेत. त्यांची आणि प्रदीप शर्मा यांची मैत्री जुनी आहे. त्यांची या आधीही पोलिसांनी चौकशी केलेली आहे. विकास यांच्यावर वाळीव पोलीस ठाण्यात बेटिंगचाही गुन्हा दाखल आहे. विकास दाभाडे यांनी भाजपच्या तिकिटावर पालिकेची निवडणूकही लढवलेली आहे. मोठ्यामोठ्या गाड्या आणि उच्च दर्जाचे राहणीमान यासह राजकीय नेत्यांशी असलेले संबंध यामुळे विकास दाभाडे हे नाव ठाण्यात चर्चेत असते. आता सोनू यांनी याबाबत फोन कॉलचे रेकॉर्डिंगही ठाणे पोलिसांना दिले आहे. दरम्यान, यावर कठोर कारवाईचीही मागणी केली आहे.एवढा

'पैसा आणतात कुठून?'

करोडो रुपयांचे आमिष दाखवणारे हे लोक एवढा पैसा आणतात कुठून? हा काळा पैसा कोणाचा आहे? याचा शोध घेतला पाहीजे असे आवाहन सोनू यांनी ठाणे पोलिसांना केले आहे. काल ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी विकास दाभाडे गँगस्टर रवी पुजारी यांचाही समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details