महाराष्ट्र

maharashtra

Nupur Sharma Controversial Case : नुपूर शर्माला भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स जारी.....

By

Published : Jun 11, 2022, 10:42 PM IST

Updated : Jun 12, 2022, 8:09 AM IST

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP spokesperson Sharma) यांनी २७ मे रोजी यू-ट्यूबवर टाईम्स या माध्यमावर मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ व श्रद्धास्थान कुराण आणि अल्लाहचे नबी मोहम्मद पैगंबर व त्यांची पत्नी हजरत आयेशा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले (Made an offensive statement) होते. त्यामुळे ३० मे रोजी रजा अकादमीचे भिवंडीतील सदस्य वकास मलिक यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. भाजपचे निलंबित नेते नवीन जिंदल (Naveen Jindal also Summoned) यांच्यावरही भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन दिवसांपूर्वीच त्यांनाही १५ जून रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स पाठिण्यात आले. काल (शुक्रवारी) नुपूर शर्मा यांनाही १३ जून रोजी पोलीस ठाण्यात हजर (Appeared on June 13) राहण्यासाठी समन्स (Summons to Nupur Sharma) बजावल्याने दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bhiwandi City Police Thane while filing the case
भिवंडी शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करताना

ठाणे : यू-ट्यूबवरील टाइम्स नाऊ चॅनेलवर वादग्रस्त विधान करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्याने रजा अकादमीचे सदस्य वकास अहमद सगीर अहमद मलिक (४०) यांनी ३० मे रोजी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मावर भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. काल (शुक्रवारी) रजा अकादमीच्या सदस्यांनी भिवंडी पोलीस ठाण्यात शिष्टमंडळासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांची भेट घेऊन शर्मांवरील दाखल केलेल्या गुन्ह्याची चौकशी केली असता, नुपूर शर्मा यांना १३ जून रोजी भिवंडी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स जारी केल्याचे सांगण्यात आले.

भिवंडी शहर पोलीस ठाणे

नवीन जिंदाल यांनाही समन्स जारी :भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी २७ मे रोजी वृत्तवाहिनी मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ व श्रद्धास्थान कुराण आणि अल्लाहचे नबी मोहम्मद पैगंबर व त्यांची पत्नी हजरत आयेशा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे ३० मे रोजी रजा अकादमीचे भिवंडीतील सदस्य वकास मलिक यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे त्यापाठोपाठ ४ जून रोजी भाजपचे निलंबित नेते नवीन जिंदल यांच्यावरही भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन दिवसांपूर्वीच त्यांनाही १५ जून रोजी गुन्ह्यासंदर्भात पोलीस ठाण्यात हजर राहण्यास समन्स पाठिण्यात आले. त्यातच काल (शुक्रवारी) नुपूर शर्मा यांनाही १३ जून रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याने दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शांतता राखण्याचे आव्हान :दरम्यान, रजा अकादमीचे भिवंडीचे महासचिव शरजील रजा कादरी यांनी मुस्लिम बांधवाना शांतता राखण्याचे आव्हान करीत भिवंडी पोलीस त्यांच्या कायद्यानुसार नुपूर शर्मांवर कारवाई करणार आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगून तसेच भिवंडी पोलिसांकडून पूर्ण सहकार्य मिळाल्याने भिवंडी पोलीस प्रशासनाचे त्यांनी आभार व्यक्त केले.


हेही वाचा : Hang Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना फाशी द्या, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

Last Updated : Jun 12, 2022, 8:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details