महाराष्ट्र

maharashtra

जीव धोक्यात घालून उंचीवर असलेल्या दहीहंडीच्या दोरीवरून सरपटत हंडी फोडणाऱ्या दारुड्याला अटक

By

Published : Aug 20, 2022, 4:52 PM IST

Updated : Aug 20, 2022, 6:08 PM IST

लोखंडी खांबाच्या साहाय्याने ८० फूट उंच असलेल्या ९ थर उंचीवर असलेल्या दहिहंडीच्या दोरीवरून जीव धोक्यात घालून सरपटत जात, एकट्या दारुड्याने डोक्याने दहीहंडी फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरमधील नेताजी चौकात उभारण्यात आलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दहीहंडी फोडणाऱ्या दारुड्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

ठाणे - लोखंडी खांबाच्या साहाय्याने ८० फूट उंच असलेल्या ९ थर उंचीवर असलेल्या दहिहंडीच्या दोरीवरून जीव धोक्यात घालून सरपटत जात, एकट्या दारुड्याने डोक्याने दहीहंडी फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगरमधील नेताजी चौकात उभारण्यात आलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दहीहंडी फोडणाऱ्या दारुड्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भोला दादाराव वाघमारे (वय, २३) असे अटक केलेल्या दारुड्याचे नाव आहे.

व्हिडिओ

दोरीला उलटा सरपटत गेला - दहीहंडीच्या दिवशी सर्वत्र उत्सव साजरा होत असतानाच, शिंदे गटातील उल्हासनगर महापालिकेचे माजी नगरसवेक अरुण आशान यांच्या जय भवानी मित्र मंडळांच्या वतीने कॅम्प नंबर पाच मधील नेताजी चौकात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला ५५ हजार ५०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यातच दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहचला असतानाच रात्री साडे दहाच्या सुमारास दारूच्या नशेत असलेला भोला हा एका बाजुच्या लोखंडी खांबावर गुपचूपपणे चढला. त्यानंतर ३० फूट लांब असलेल्या दहीहंडीजवळ पोहचण्यासाठी जीव धोक्यात घालून दोरीला उलटा सरपटत जाऊन हंडीच्या ठिकाणी पोहचला, तोपर्यंत बध्याच्या गर्दीमधून एकाने मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले.

जीव धोक्यात घालून दहीहंडी फोडली तर दुसरीकडे त्याचे बरेवाईट होईल यामुळे आयोजकांनी तातडीने लोखंडी खांबाला बांधलेली दोन्ही बाजूची दोरी ह्ळूहळू सोडून त्याला खाली आणण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच, त्याने उंचावरच डोक्याने दहीहंडी फोडल्याचे पाहून गोविंदा पथकासह नागरिकांनी त्याच्या हिंमतीला दाद दिली. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. आरोपी भोला हा मूळचा यवतमाळचा रहिवाशी असून तो कँम्प नंबर पाचमध्ये मोलमजुरी करून फुटपाथ राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. शिवाय त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याने दारूच्या नशेत जीव धोक्यात घालून दहीहंडी फोडण्याने पोलीस हवालदार संदीप बर्वे (वय ४१) यांच्या तक्रारीवरून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक व्ही. एन. जाधव करीत आहेत.

हेही वाचा -Deepak Kesarkar देवेंद्र फडणवीसांमुळेच शिवसेना 2017 मध्ये मुंबईत सत्तेत, दीपक केसरकरांचा दावा

Last Updated : Aug 20, 2022, 6:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details