पुणे: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फार्मसी कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये घुसून अनोळखी तरुणाने (unknown youth attempted to rape on college girl) कॉलेज युवतीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न (JSPM college hostel girl rape attempted) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील हांडेवाडी रोडवर असलेल्या फार्मसी कॉलेजमधील तिसऱ्या मजल्यावर गर्ल टॉयलेटमध्ये एका अनोळखी इसमाने घुसून युवतीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न (Rape Attempt In JSPM Collage Hostel) केला आहे. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनोळखी माथेफिरुविरुद्ध पुण्यातील वानवडी पोलिसात विविध गंभीर कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rape Attempt JSPM Collage : आरोग्य मंत्र्याच्या कॉलेजमध्ये अनोळखी तरुणाचा युवतीवर बलात्काराचा प्रयत्न
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फार्मसी कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये घुसून अनोळखी तरुणाने (unknown youth attempted to rape on college girl) कॉलेज युवतीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न (JSPM college hostel girl rape attempted) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पुण्यातील हांडेवाडी रोडवर असलेल्या फार्मसी कॉलेजमधील तिसऱ्या मजल्यावर गर्ल टॉयलेटमध्ये एका अनोळखी इसमाने घुसून युवतीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न (Rape Attempt In JSPM Collage Hostel) केला आहे.
कॉलेज प्रशासनाचे हाताची घडी, ताेंडावर बोट -दोन दिवसापूर्वी धक्कादायक प्रकार घडला असून मुलीच्या वस्तीगृहातील सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात कॉलेज प्रशासन मात्र याबाबत बोलण्यास तयार नाही आहे. राज्याचे आरोग्य मंत्री आणि त्यांच्या महाविद्यालयात जर मुली सुरक्षित नसतील त्या ठिकाणी जर मुलीच्या सुरक्षितेचा प्रश्न गांभीर्याने घेतला गेलेला नसेल तर या मुली सुरक्षित कसे राहतील असा प्रश्न उपस्थित होतोय. आरोग्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये असे प्रकार होत असतील तर राज्यातील महिला सुरक्षेचे काय असाही आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आरोग्य मंत्र्यांच्या कॉलेजमध्ये मुली मात्र असुरक्षित आहेत.