महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन इफेक्ट : सांस्कृतिक कला-केंद्रांना टाळं, कलावंतांवर आर्थिक संकट

महामारी सुरू झाल्यानंतर त्याचा फटका सर्व क्षेत्रांना बसला. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे तसेच सांस्कृतिक क्षेत्र देखील प्रभावित झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील संगीतबाऱ्या बंद झाल्या; आणि नर्तकींना पोटापाण्यासाठी नवे मार्ग चाचपडावे लागले. पाहा 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट...

By

Published : Jul 2, 2020, 8:01 PM IST

लावणी कलावंत
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील संगीतबाऱ्या बंद झाल्या; आणि नर्तकींना पोटापाण्यासाठी नवे मार्ग चाचपडावे लागले.

पुणे - महामारी सुरू झाल्यानंतर त्याचा फटका सर्व क्षेत्रांना बसला. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे तसेच सांस्कृतिक क्षेत्र देखील प्रभावित झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील संगीतबाऱ्या बंद झाल्या; आणि नर्तकींना पोटापाण्यासाठी नवे मार्ग चाचपडावे लागले.

मागील तीन महिन्यापांसून राज्यभरातील सांस्कृतिक केंद्र बंद आहेत. त्यामध्ये काम करणारे कलावंत मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्रात अंदाजे 65 सांस्कृतिक कला केंद्र आहेत. त्यामध्ये अंदाजे 13 ते 14 हजार नृत्यांगणा कला सादर करून उपजीविका भागवत असतात. या कलाकारांसोबत काम करणारे वादक, सोंगाडे, गायक यांची संख्याही मोठी आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून या सर्वांच्या हाताला कोणतेही काम नाहीय. त्यामुळे सध्या उपासमारीची वेळ ओढावली आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील संगीतबाऱ्या बंद झाल्या; आणि नर्तकींना पोटापाण्यासाठी नवे मार्ग चाचपडावे लागले.
रेश्मा परितेकर या पारंपारिक लावणी कलाकार असून त्या स्वतः एका संगीतबारीच्या मालक आहेत. कला-केंद्र संगीत बारीतील कलाकारांवर बेरोजगार होण्याची वेळ आलीय. या क्षेत्रात काम करणाऱ्या एका कलाकारावर दहा ते बारा जणांचं कुटुंब अवलंबून असतं. संगीतबारीच्या एका ग्रुपवर साधारण 100 जण अवलंबून असतात. 'आज कमावलं; तर उद्या खाणार', अशी परिस्थिती कलाकारांची असते. परंतु मागील तीन महिन्यांपासून सांस्कृतिक कला केंद्र बंद असल्यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली. सुशिक्षित नसल्याने प्रतिष्ठित नोकऱ्या त्यांच्या वाट्याला येत नाहीत. आजवर त्यांनी फक्त नाचगाण्याचं काम केलंय. त्यांना इतर दुसरं काम येत नाही. त्यामुळे कला केंद्र लवकर सुरू झाल्यानंतरच त्यांच्या पोटाचा प्रश्न मिटेल.सध्या कला केंद्र बंद असल्यामुळे काही कलाकार शेतात काम करतात. तर काही कंपनीत जातात. परंतु तेथील काम त्यांना झेपत नाही. त्यांनी आयुष्यभर नाचगाण्याचं काम केलंय. अन्य कोणतेही कौशल्य नाही. वृद्ध कलाकारांना शासनाकडून दरमहा पेन्शन मिळत होती. मागील काही महिन्यांपासून ती पेन्शन बंद झाली. कलाकारांना शासनाकडून मिळणारे अनुदान थांबले. त्यामुळे सांस्कृतिक कला केंद्रात काम करणाऱ्या कलाकारांसमोर सध्या दुसरा कोणताही मार्ग नाही.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील संगीतबाऱ्या बंद झाल्या; आणि नर्तकींना पोटापाण्यासाठी नवे मार्ग चाचपडावे लागले.
महाराष्ट्र तमाशा थेटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक जाधव म्हणाले, सांस्कृतिक कला केंद्र सुरू झाले तर तेथील कलाकारांचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. सरकारने या कामी पुढाकार घ्यावा आणि काही अटी नियम घालून देऊन हे कला केंद्र सुरू करण्यास परवानगी दिल्यास नियमांचे काटेकोरपणे पालन करून कला सादर केली जाईल.

पुण्यातील आर्यभूषण थिएटरचे सचिव राजेश तांबे म्हणाले कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे आम्हालाही भान आहे. परंतु शासनाने काही नियम घालून दिल्यास आम्ही त्याचे काटेकोरपणे पालन करू. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ती जागा सॅनिटाइझ केली जाईल. येणाऱ्या ग्राहकांनाही सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जाईल. मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचा नियम देखील पाळू, पण शासनाने आम्हाला सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील संगीतबाऱ्या बंद झाल्या; आणि नर्तकींना पोटापाण्यासाठी नवे मार्ग चाचपडावे लागले.
पुण्यात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सांस्कृतिक कला केंद्र थेटर संघटनेच्यावतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील सांस्कृतिक कला केंद्र सुरु करण्याची राज्य सरकारला विनंती करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत कलावंतांसाठी काही मागण्याही करण्यात आल्या होत्या. त्यात सर्व सांस्कृतिक कलावंतांना आर्थिक मदत व पॅकेज जाहीर करावे, लोक कलावंतांना जगवण्यासाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, लॉकडाऊन उठल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आल्यावर शासनाने लावणी महोत्सव आयोजित करावा.

कलाकारांना भेटण्यासाठी, कला सादर करण्यासाठी व समन्वयासाठी हक्काचे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे. यासारख्या काही मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सरकार त्यांच्या या मागण्यांकडे कशा प्रकारे पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details