महाराष्ट्र

maharashtra

लेफ्टनंट कर्नल रश्मी मिश्रा यांची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Oct 13, 2021, 2:55 PM IST

लेफ्ट. कर्नल रश्मी मिश्रा या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आल्या असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लष्कर अधिकारी महिलेने गळफास लावून आत्महत्या केली
लष्कर अधिकारी महिलेने गळफास लावून आत्महत्या केली

पुणे- शहरातील वानवडी परिसरात एका लेफ्टनंट कर्नल लष्कर अधिकारी महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. रश्मी मिश्रा (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

कर्नल रश्मी मिश्रा ट्रेनिंगसाठी पुण्यात आल्या होत्या

जयपूर येथे नेमणुकीस असलेल्या लेफ्ट. कर्नल रश्मी मिश्रा या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आल्या असताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आत्महत्या करण्यापुर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा अंदाज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर येथे नेमणुकीस असलेल्या कर्नल रश्मी मिश्रा या आर्मीच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी चहावाला रूमवर आला होता. मात्र आतमधून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद आला नाही. त्यानंतर तेथील कर्मचार्‍यांना त्याने सांगितले. त्यावर दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता, रश्मी मिश्रा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. रूमची पाहणी केली असता मोबाईल एका बाजूने ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे आत्महत्या करण्यापुर्वी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा अंदाज आहे. तो मोबाईल ऑफ असल्याने शोध सुरू आहे. तसेच कर्नल रश्मी मिश्रा यांचे पती लष्करात कर्नल पदावर कार्यरत आहेत, तर वडीलही लष्करी अधिकारी आहेत. रश्मी मिश्रा आणि पतीचा घटस्फोटाचे प्रकरण प्रलंबित आहे, अशी माहिती समोर येत असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.
हेही वाचा - महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details