महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 9, 2021, 10:27 AM IST

ETV Bharat / city

पुण्याच्या चार वर्षीय इशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड; तीन मिनिटात ओळखले 195 ध्वज

चिंचोडी- लांडेवाडी ता.आंबेगाव येथील इशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने सर्व देशांचे झेंडे ओळखून, त्यांच्या राजधान्या पाठ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. टरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

ishanavi
ishanavi

पुणे - चिंचोडी- लांडेवाडी ता.आंबेगाव येथील इशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने सर्व देशांचे झेंडे ओळखून, त्यांच्या राजधान्या पाठ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

इशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड

3 मिनिटात ओळखले १९६ राष्ट्रध्वज

दुबई येथे झालेल्या स्पर्धेत तिने हे यश मिळवले. मूळचे आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची चार वर्ष 11 महिन्याची कन्या ईशानवी बाळासाहेब आढळराव-पाटील हिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. 15 जून रोजी तिने 195 देशांचे झेंडे ओळखून त्यांच्या राजधान्या केवळ तीन मिनिटे दहा सेकंद इतक्या जलद गतीने सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे. कोणतीही गोष्ट स्वयंस्फूर्तीने आत्मसात करण्यासाठी ईशानवीमध्ये असलेली जिद्द व चिकाटी कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया तिची आई निता आढळराव व भाऊ आराध्य आढळराव यांनी व्यक्त केली आहे. जागतिक विक्रमाची नोंद केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

तीन मिनिटात ओळखले 195 ध्वज

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : केंद्रीय 'सहकार' मंत्रालयामुळे राज्याच्या अधिकारांवर येणार गदा?

ABOUT THE AUTHOR

...view details