महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 30, 2021, 11:46 AM IST

Updated : May 1, 2021, 6:26 AM IST

ETV Bharat / city

पुण्यातील वेश्यांना ही ब्रिटिश तरुणी पुरवते जेवणाचे डबे, ६ हजार गरजूंना केली मदत

लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून बुधवारपेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे ग्राहक येत नाहीत. त्यामुळे येथील महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बुधवार पेठेतील महिलांसाठी 'ही' महिला ठरली देवदूत
बुधवार पेठेतील महिलांसाठी 'ही' महिला ठरली देवदूत


पुणे- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर पुण्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून पुण्यातील व्यवहार ठप्प आहेत. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद आहेत. अनेकांचा रोजगार देखील हिरावला गेला. त्याप्रमाणेच पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचीदेखील हीच अवस्था आहे. त्यांच्या मदतीला काही समाजसेवी व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून बुधवारपेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे ग्राहक येत नाहीत. त्यामुळे येथील महिलांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत समाजातील अनेक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संघटना या महिलांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. अशाचप्रकारे एका ब्रिटिश तरुणीने देखील या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला. आकांक्षा सडेकर असे या तरुणीचे नाव आहे.

अनेकांना केले अन्नदान

मुंबईत जन्म झाल्यानंतर ही तरुणी लहानाची मोठी स्कॉटलंडमध्ये झाली. मागील सहा वर्षांपूर्वी ती पुन्हा भारतात परतली. कोरोनाची दुसरी लाट जेव्हा सुरू झाली तेव्हा ती पुण्यात होती. यावेळी ट्विटरवरून एका वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या घेणाऱ्या विद्यार्थ्याने लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल होत असल्याची व्यथा मांडली होती. हे ट्विट आकांक्षाने पाहिले आणि तिने अशाप्रकारे अडचणीत असणाऱ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत तिने आतापर्यंत सहा हजार गरजूंपर्यंत जेवणाचे डबे पोच केले असल्याचे सांगितले.

महिलांची उपासमार होत होती-

आपल्या या उपक्रमाविषयी सांगताना आकांक्षा म्हणाली, सुरुवातीच्या काळात आम्ही जेव्हा गरजू व्यक्तींपर्यंत अन्न कसे पोच करता येईल, त्याच्या शोधात असताना आम्हाला भेटलेल्या पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अन्नाची गरज सर्वात जास्त असल्याचे सांगितले. कारण लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडण्यास बंदी होती. त्यामुळे बुधवार पेठेतील रस्ते ओस पडले होते. परिणामी या महिलांची उपासमार होत होती. तेव्हापासून आम्ही येथील महिलांना जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली. या उपक्रमाची माहिती आम्ही ट्विटरच्या माध्यमातून दिल्यानंतर अनेक स्वयंसेवक किती आमच्या सोबत घेऊन काम करत आहेत,अशी माहितीही त्यांनी दिली.

Last Updated : May 1, 2021, 6:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details