महाराष्ट्र

maharashtra

'गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील' - अजित पवार

By

Published : Jan 1, 2022, 10:06 AM IST

राज्यातील ओमायक्रॉनची वाढता प्रसार लक्षात घेता गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Omicron Variant) यांनी दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी 204 व्या शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

Ajit pawar
Ajit pawar

पुणे :- राज्यासह पुणे आणि मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे राज्यात काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे. नागरिकांनी तारतम्य ठेवून वागावे तसेच रुग्णसंख्या वाढीचा प्रमाण काय आहे हे पाहून नियम केले जातील. तसेच गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Omicron Variant) यांनी दिला आहे.

अजित पवारांची प्रतिक्रीया
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी 204 व्या शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
भीमा कोरेगांव परिसराचा विकास
भीमा कोरेगांव भूमीच्या (Bhima Koregaon Vijay Diwas) शूरवीरांना अभिवादन करतो. इथला इतिहास हा नेहमीच स्मरणात राहील. कोरेगांव भीमा येथील विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भविष्यात लवकर या परिसराचा विकास होईल असेही पवार म्हणाले.
म्हणून बैलगाडा शर्यतीची परवानगी नाकारली
कोणीही व्यक्ती असेल तरीही कोरोनाच मोठं संकट आहे. माणसाच्या जीवाशी खेळता येणार नाही. जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. शर्यतीला थोडं मुरुड घातलं पाहिजे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यानाच करावी लागेल. म्हणून जिल्हाधिकारी यांनी बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्य कोरोनामुक्त होणं हाच नवीन वर्षाचा संकल्प
येणाऱ्या नवीन वर्षात राज्य कोरोना मुक्त होवे हेच नवीन वर्षाचा संकल्प आहे.10 मंत्री आणि 20 आमदार हे कोरोनाबाधित झाले आहे. राज्यात कोरोना वेगाने पसरत आहे. नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं देखील यावेळी पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details