महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 16, 2021, 8:48 AM IST

ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून केली श्रीपाद नाईक यांच्या तब्येतीची चौकशी

११ जानेवारीला आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा भीषण अपघात झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.

Shripad Naik
श्रीपाद नाईक

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या तब्येतीची दूरध्वनीवरून चौकशी केली. मोदींनी त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. नाईक यांनी आपल्याला कालच्या तुलनेने आज अधिक बरे वाटते आहे, असे सांगून पंतप्रधानांचे आभार मानले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील काल (शुक्रवार) सकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) आणि रुग्णालयात जाऊन नाईक यांच्या तब्येतीची विचारापूस केली.
यावेळी त्यांच्या सोबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सतीश धोंड आणि जीएमसीचे अधिष्ठाता डाॅ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.

नाईकांच्या गाडीला झाला होता अपघात -

कर्नाटकातील येल्लापूर (ता. अंकोला) येथे देवदर्शन करून गोकर्णच्या दिशेने जात असताना संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान आयुषमंत्री नाईक यांच्या इनोव्हा कारचा हिल्लूर-होरकांबी (उत्तर कर्नाटक) येथे अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्या पत्नी विजया आणि स्वीय सहाय्यक दीपक घुमे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मंत्री नाईक यांच्यासह अन्य तिघे गंभीर जखमी झाले. नाईक यांना रात्री तातडीने गोमेकॉमध्ये आणण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी तत्काळ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनी वरून संवाद साधत आवश्यकता उपचारांची सूचना दिली होती. तर, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी गोमेकॉला भेट देत नाईक यांच्या तब्येतेची माहिती घेतली होती. राजनाथसिंह यांनी नाईक यांच्या सांव पेद्रो (जूने गोवे) येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वनही केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details