महाराष्ट्र

maharashtra

'महाविकास आघाडी'विरोधात भाजप महिलांचे तीव्र आंदोलन

By

Published : Feb 25, 2020, 6:24 PM IST

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, भविष्यात महिलांवरील अत्याचार थांबले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपने दिला आहे.

nashik bjp
'महाविकास आघाडी'विरोधात भाजप महिलांचे तीव्र आंदोलन

नाशिक - महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे म्हणत भाजपच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला भाजप कार्यकर्त्यांनी काळ्या साड्या परिधान करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

'महाविकास आघाडी'विरोधात भाजप महिलांचे तीव्र आंदोलन

महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी हे वचन पूर्ण केले नाही. तसेच अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदतही दिली नाही. फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, भविष्यात महिलांवरील अत्याचार थांबले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपने दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details