महाराष्ट्र

maharashtra

नाशिक; श्री काळाराम मंदिरात महिलांनी एकत्र येत साजरा केला दिपोत्सव

By

Published : Aug 4, 2020, 9:42 PM IST

देशभरात राम मंदिर भूमीपूजनाचा आनंद साजरा केला जात आहे. नाशिकमधील काळाराम मंदिराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी आठवडा भरापासून विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल आहे.

dipotsav
श्री काळाराम मंदिरात महिलांनी एकत्र येत साजरा केला दिपोत्सव

नाशिक - अयोध्या येथे बुधवारी राम मंदिराचे भूमीपूजन होत असून, त्याचा नाशिकमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. श्री काळाराम मंदिरात महिलांनी एकत्र येत दिपोत्सव साजरा करुन, रामाची महाआरती केली. यावेळी मंदिरातील गाभारा दिव्यांच्या मंद ज्योतीने उजळला होता.

श्री काळाराम मंदिरात महिलांनी एकत्र येत साजरा केला दिपोत्सव

देशभरात राम मंदिर भूमीपूजनाचा आनंद साजरा केला जात आहे. नाशिकमधील काळाराम मंदिराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा आहे. या ठिकाणी आठवडा भरापासून विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल आहे. राम मंदिर भूमीपूजनाच्या पूर्वसंध्येला महिलांनी काळाराम मंदिरात दिपोत्सव साजरा केला. रामाची महाआरती करून रामरक्षा व राम भक्तीगिते गायली.

यावेळी मंदिराचा परिसर राममय झाला होता. अयोध्या राम मदिराचा जो संकल्प आहे, त्याची परीपुरतता बुधवारी आहे. त्यामुळे रामरायाचे पूजंन करून तीर्थप्रसाद भाविकांपर्यंत आम्ही पोहोचणार असल्याची माहिती स्थानिक पुजाऱ्यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details