महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLC Election Result : चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयाने पूर्व विदर्भात भाजपाला गतवैभव प्राप्त होणार!

नागपुरात भाजपला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी बावनकुळे यांना जोमाने कामाला लागावे लागेल. मात्र काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून ओळख निर्माण करू पाहत असलेले सुनील केदार ( Congress Leader Sunil Kedar ) हे देखील नागपूरसह विदर्भाकडे विशेष लक्ष देत असल्याने भविष्यात या दोन नेत्यांमध्ये सामना रंगण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे नाव केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचे आहे.

MLC Election Result
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Dec 16, 2021, 2:23 AM IST

नागपूर- भारतीय जनता पक्षाच्या पूर्व विदर्भातील दमदार शिलेदार म्हणून ओळख असलेले संघर्षशील नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) नावाची तोफ आता विधानपरिषदेत गरजनार आहे. एखाद्या विषयाला तडीस घेऊन जाण्याची ताकत आणि क्षमता त्यांच्यात असल्याने राज्य सरकारला देखील त्यांची दखल घ्यावी लागेल. केवळ नागपूरचं नाही तर संपूर्ण विदर्भातील भाजपाचे राजकारण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अवती-भोवती फिरते. ते माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadanvis ) यांच्या मर्जीतील नेते म्हणून देखील ओळखले जातात. नागपूरसह पूर्व विदर्भ किंबहुना संपूर्ण विदर्भातील राजकारणावर त्यांची छाप आहे. आता तर ते विधानपरिषद निवडणुकीत ( Nagpur MLC Election ) दमदार विजय मिळवत ग्रँड कमबॅक केल्यामुळे बावनकुळे यांची ताकत वाढली असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. गेल्या दोन वर्षात भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपुरात भाजपची काहीशी पीछेहाट झाली आहे. मात्र आता बावनकुळे आमदार म्हणून निवडून येताच त्यांचे भाजप मधील वजन वाढले आहे.

नागपुरात भाजपला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी बावनकुळे यांना जोमाने कामाला लागावे लागेल. मात्र काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून ओळख निर्माण करू पाहत असलेले सुनील केदार ( Congress Leader Sunil Kedar ) हे देखील नागपूरसह विदर्भाकडे विशेष लक्ष देत असल्याने भविष्यात या दोन नेत्यांमध्ये सामना रंगण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे नाव केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Cabinet Minister Nitin Gadkari ) यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. पूर्व विदर्भात भाजपला मत संपन्न बनवण्याची ताकत त्यांच्यात असल्याने पक्षश्रेष्ठींना देखील बावनकुळे यांच्याकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडेल याची कल्पना २०१९ च्या विधानसभा निवडणुकी आली होती. म्हणुन शक्य तितक्या लवकर चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन करण्याची घाई भाजपला झाली होती.

बावनकुळे यांचा राजकीय प्रवासातील उतार-चढाव -

जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. भाजपचे अभ्यासू आणि आक्रमक नेता म्हणून त्यांनी आपली ओळख संपूर्ण जिल्हात निर्माण केली. पुढे ते आमदार आणि मंत्री देखील झाले. राजकिय जीवनात यशाच्या शिखराकडे वेगाने वाटचाल सुरू असताना अचानक एक काळ असा देखील आला, ज्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय जीवनच पणाला लागले होते. भाजपात बावनकुळे नावाचा अस्त झाला असा समज त्यांच्या राजकीय विरिधकांचा झाला असताना पुन्हा ते नव्या दमाने आणि क्षमतेने पुढे आले. एवढंच काय तर मोठ्या मताधिक्याने विधानपरिषदेची निवडणूक जिंकत ते आमदार देखील झाले आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप मधील पत आणखी वाढली आहे.

पालकमंत्री म्हणून दमदार कामगिरी -

प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभर ओळख मिळावी आहे. ऊर्जामंत्री म्हणून देखील त्यांनी उत्तम काम केलं आहे. विशेष करून पालकमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली होती. पालकमंत्री म्हणून त्यांनी नागपूरसाठी अनेक योजना राबवल्या होत्या. जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डीपीडीसीच्या निधीत किती तरी पटीने वाढ करून त्यांनी जिल्ह्यासाठी निधी कमी पडू दिला नाही.

केदार विरुद्ध बावनकुळे सामना रंगणार -

चंद्रशेखर बावनकुळे यांची संपूर्ण जिल्ह्यातील भाजपवर पकड आहे. शहर असो की ग्रामीण भाजपामध्ये त्यांच्या नावाला किंमत आहे. मतदारांची नाळ कशी ओळखायची हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र 2019 मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारून कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली, त्यामुळे गेल्या काळात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असेल यामध्ये भारतीय जनता पक्षाला अपयशाचा सामना करावा लागला होता. यादरम्यान काँग्रेस नेते सुनील केदार यांनी नागपूर शहरासह ग्रामीण भागात आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. जिल्हा परिषद निवडणुकीत सुनील केदार यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात केदार विरुद्ध बावनकुळे आता सामना रंगण्याची शक्यता आहे.

पूर्व विदर्भात भाजपला जनाधार मिळवून देणारा नेता -

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली ज्याचा फटका भाजपला निकालात बसला. बावनकुळे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्व विदर्भात तेली समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली असल्याने भाजप तेली विरुद्ध असल्याचा मॅसेज देखील गेला होता. मात्र आता बावनकुळे यांना पुन्हा आमदारकी मिळाली आल्याने हा दुरावलेले मतदार पुन्हा भाजपच्या बाजूने येईल, अशी आशा भाजपा पक्षश्रेष्ठींना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details