नागपूर - गोविंदांना नोकरीत 5 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर नागपुरात अजित पवार यांनी भाष्य Ajit pawar on reservation to govinda in jobs केले आहे. भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेऊन चालत नाही, असा सल्ला विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. अजित पवार हे अमरावतीतील reservation to govinda in jobs in maharashtra मेळघाटाच्या दौऱ्यासाठी विदर्भात आले आहेत. यावेळी नागपुरात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी ajit pawar on dahi handi ही भूमिका व्यक्त केली.
हेही वाचाAbdul Sattar कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस शेती करणार आणि शिकणार
बाकीचे स्पर्धा परिक्षा देणारे काय करणारपुणे सह इतरही भागात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. वेगेवेगळ्या प्रकारचे मान्यता असलेले खेळ खेळतात. ते खेळ खेळून राष्ट्रीय पातळीवर जेव्हा खेळाडू नाव लौकिक करतात तेव्हा त्याना नोकरित शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना आरक्षण देतो. पण, दहीहंडी या खेळाचा काय रेकॉर्ड ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कबड्डी खेळाचा रेकॉर्ड असतो, त्यांची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होते. यात गोविंदाचा रेकॉर्ड कसा ठेवणार आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होत नाही. मुख्यमंत्री ठाण्याचे प्रतिनिधित्व करतात, तिथे दहीहंडी हा मोठ्या प्रमाणत साजरा होतो. त्यांना पाच टक्के आरक्षण देताना एखादा न शिकलेला उमेदवार असेल तर बाकीचे स्पर्धा परिक्षा देणारे काय करणार असाही प्रश्न उपस्थित केला. पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्या परीक्षा का घेत नाही? असा सवाल उपस्थित केला. तसेच आमच्या सरकारच्या काळात दुर्दैवाने काही पेपरफुटी प्रकार घडले. पण आता पारदर्शकता ठेवून परीक्षा घ्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
लोकशाहीत मनात विचार आला म्हणून काहीही करता येत नाहीमहाराष्ट्राच्या कानाकोपरात स्पर्धा परीक्षेसाठी आरक्षण असल्याने मुले तयारी करत आहेत, याचाही विचार मुख्यमंत्री यांनी करायला पाहिजे. भावनिक होऊन निर्णय न घेता जबाबदारीने आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. एकदा गोविंदाच्या कुटुंबीयांना विमा देण्याला हकरत नाही. पण अशा पद्धतीने पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा ही चुकीची आहे. लोकशाहीत मनात आले तसे जाहीर करता येत नाही, सर्वांचा विचार घ्यावा लागतो, असाही सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.