महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आलेल्या 'त्या' सर्व 62 जणांची टेस्ट निगेटिव्ह

By

Published : May 19, 2020, 6:51 PM IST

चार दिवसांपूर्वी नागपूर शहर पोलीस दलातील दोन आणि एसआरपीएफचा एक अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 62 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले. यामध्ये एसआरपीएफचे 37 जवान तसेच तहसील पोलीस स्टेशनचे 5 कर्मचारी, नियंत्रण कक्षातील 12 आणि डीसीपी कार्यालयातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

नागपूर मेयो रुग्णालय
नागपूर मेयो रुग्णालय

नागपूर- पोलिसांसाठी आणि नागपूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नागपुरात 3 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर ज्या 62 पोलिसांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले होते, त्या सर्वांचे कोरोना टेस्टचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पोलीस विभागासह प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

या सर्व 62 पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने सध्यातरी नागपूर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव थांबला आहे.

चार दिवसांपूर्वी नागपूर शहर पोलीस दलातील दोन आणि एसआरपीएफचा एक अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 62 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले. यामध्ये एसआरपीएफचे 37 जवान तसेच तहसील पोलीस स्टेशनचे 5 कर्मचारी, नियंत्रण कक्षातील 12 आणि डीसीपी कार्यालयातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्व क्वारंटाईन पोलिसांची स्वॅब तपासणी करण्यात आली. मेयो रुग्णालयातून त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती पोलीस प्रशासनास प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.

नागपुरात सध्या कोरोनाबाधितांची आकडेवारी

नागपुरात गेल्या 24 तासांत (मंगळावारी सकाळपर्यंत) उपचार घेत असलेले तब्बल 61 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 272वर पोहोचला आहे. या सर्व रुग्णांना केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नवीन गाईडलाईननुसार डिस्चार्ज मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details