महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 22, 2021, 11:47 AM IST

ETV Bharat / city

Fake vaccination case: मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी तीन गुन्हे दाखल

हिरानंदानी सोसायटीत बनावट लसीकरणाबाबत पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक डॉक्टर आहे. त्याच्या नावावर कांदिवली, वर्सोवा, खार पोलीस ठाण्यांत विवध प्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहे.

Fake vaccination case
Fake vaccination case

मुंबई - कांदिवली परिसरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असणाऱ्या हिरानंदानी सोसायटीमधील 390 नागरिकांना देण्यात आलेल्या बनावट व्हॅक्सिनेशन संदर्भात मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली असताना यातील एक महत्त्वाचा आरोपी हा फरार असल्याचे समोर आले आहे. फरार झालेला आरोपी हा डॉक्टर असून याचा या प्रकरणामध्ये मोठा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. बनावट लसीकरणाच्या संदर्भात मुंबईतील कांदिवली, वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून यात एकच टोळी सतर्क असल्याचे समोर आले आहे.

वर्सोवा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा
मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यात एका चित्रपट निर्मिती संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना फसविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 29 मे रोजी मॅच बॉक्स पिक्चर्स या चित्रपट निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या 150 कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली होती. लस घेणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारची लक्षणे किंवा त्रास झालेला नव्हता. याबरोबरच या व्यक्तींना त्यांचे लसीकरणाचे प्रमाणपत्रही देण्यात टाळाटाळ करण्यात येत होती.

खार पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल
अशाच एका प्रकरणात तिसरा कुणाही खार पोलिस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेला असून कोकिलाबेन धीरूभाई अंबानी च्या माजी कर्मचारी असलेल्या राजेश पांडे यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. संजय गुप्ता नावाच्या व्यक्तीकडून टिप्स इंडस्ट्रीज च्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय करण्यात आलेली होती. यासाठी अडीच लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, लसीकरण केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नसल्यामुळे खार पोलिस ठाण्यांमध्ये हा तिसरा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान बनावट लसीकरण करणारी टोळी सध्या मुंबईत सतर्क असून या टोळीकडून मुंबईतील परळ, अंधेरी, कांदिवली व ठाण्यातील काही परिसरात अशा प्रकारचे लसीकरण करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -सातारा - जावळीत अल्पवयीन मुलीवर दोन वर्गमित्रांचा बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details