मुंबई: Mumbai Coastal Road Project: कोस्टल रोड प्रकल्प उभारताना समुद्रात भराव टाकला जाणार आहे. या भरावावर उद्याने, जॉगिंग ट्रॅक, शौचालये, खुले नाट्यगृह, पार्किंग आदी नागरी सुविधा दिल्या जाणार आहेत. समुद्रात भराव टाकून अशा नागरी सुविधा देण्याचे काम रोखण्यात आले होते. याला पालिकेने सर्वोच्च न्यायालयात Supreme Court याचिका दाखल करून आव्हान दिले. यावर न्यायालयाने नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली आहे. Supreme Court on Coastal Road Project यावर समधन वक्त करत कोस्टल रोड निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी व्यक्त केला आहे.
कोस्टल रोड किनारी या सुविधा बृहन्मुंबई महापालिकेचा Brihanmumbai Municipal Corporation महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणा-या आणि मुंबईकर नागरिकांसाठी बहु-उपयोगी ठरणा-या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यासाठी (कोस्टल रोड) उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७० ते ७५ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त १ हजार ८५६ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमीगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. यात 'लॅण्डस्केपिंग' प्रत्यक्ष स्वरुपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी दिली आहे.
७० ते ७५ टक्के जागेत नागरी सुविधामुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत 'लॅण्डस्केप' व संबंधित कामांची माहिती देताना स्वामी यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात म्हणजेच २८ लाख ५२ हजार २९५ चौरस फुटांमध्ये सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत.
३ भूमिगत वाहनतळे दक्षिण मुंबईतील श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वरळी वांद्रे सी लिंक) वरळी बाजुच्या दरम्यान 'मुंबई सागरी किनारा रस्ता' बांधला जात आहे. या रस्त्यावर ३ भूमीगत वाहनतळ असणार आहेत. महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा, अमर सन्स गार्डन, वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ८५६ एवढी असणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाहनतळ भूमीगत असणार असून त्यांच्या छतावरती उद्यान वा खेळाचे मैदान विकसित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.
फुलपाखरु उद्यान सागरी किनारा रस्त्याची उभारणी करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची परवानगी देताना केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने 'बॉटॅनिकल बटरफ्लाय गार्डन' उभारण्याची अट घातलेली आहे. त्यानुसार उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महापालिकेद्वारे एक 'फुलपाखरु उद्यान' विकसित करण्यात येणार आहे.