महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 4, 2021, 10:58 AM IST

Updated : Apr 4, 2021, 11:17 AM IST

ETV Bharat / city

'महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे फडणवीसांना माहीत असायला पाहिजे'

महाराष्ट्र आत्मनिर्भर असल्यामुळे देशाच्या तिजोरीवर सर्वात मोठी आर्थिक भर टाकत असतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई - राज्यात केवळ भाजपाचे सरकार नाही म्हणून कोंडी करणे हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि संसदीय लोकशाहीला धरून नाही, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र आत्मनिर्भर असल्यामुळे देशाच्या तिजोरीवर सर्वात मोठी आर्थिक भर टाकत असतो. महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल, हे आपल्या विरोधीपक्ष नेत्यांना माहीत असायला पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा -भाजप नावाचे संकट दूर करायचे असेल तर ममता बॅनर्जींच्या पत्राचा विचार करावा -संजय राऊत

'महाराष्ट्र आत्मनिर्भरच'

मुंबई शहर अडीच लाख कोटींच्या वर महसूल देते, म्हणजे आम्ही आत्मनिर्भरच आहोत, असे ते म्हणाले. मात्र कोरोनाचे संकट मोठे आहे, अशावेळी केंद्राने सर्व राज्यांना विशेषत: महाराष्ट्राला मदत करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -'ममता बॅनर्जी एकट्या सर्वांना पुरून उरतील'; संजय राऊत यांना खात्री

'मोदींशी वैर नाही'

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आमचे वैर नाही, मात्र राज्यात केवळ भाजपाचे सरकार नाही म्हणून कोंडी करणे हे राष्ट्रीय एकात्मतेला आणि संसदीय लोकशाहीला धरून नाही, असे ते म्हणाले.

'टेस्टिंगही जास्त'

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. मुंबईत १० हजार रुग्ण आहेत. मात्र टेस्टिंगही जास्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Apr 4, 2021, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details