महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मिलिंद देवरा म्हणाले मोदी लाट ओसरली. . .तर अरविंद सावंतानी व्यक्त केला जिंकण्याचा विश्वास. . . ..

उच्चभ्रू लोकवस्तीचा भाग म्हणून दक्षिण मुंबई मतदार संघ मानला जातो. मोदी लाटेत काँग्रेसचा हा गड शिवसेनेने जिंकला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले मताधिक्य टिकवणे हेच युतीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

By

Published : Apr 6, 2019, 2:36 PM IST

अरविंद सावंत आणि मिलींद देवरा

मुंबई- दक्षिण मुंबई मतदार संघ हा उच्चभ्रू लोकवस्तीचा भाग मानला जातो. मोदी लाटेत काँग्रेसचा हा गड शिवसेनेने जिंकला. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले मताधिक्य टिकवणे हेच युतीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

दक्षिण मुंबई मतदार संघ
मलबार हिल, नेपीयंसी रोड, ब्रिचकँडी, पेडर रोड या उच्चभ्रू लोकवस्तीसह कुलाबा, भायखळा, शिवडी येथील काही झोपडपट्यांचा समावेश या मतदार संघात आहे. मोदी लाटेत या मतदार संघात केवळ 54 टक्के मतदान झाले होते. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी तब्बल 1 लाख 28 हजार मतांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना पराभूत केले होते. मात्र आता लाट ओसरली असल्याने शिवसेनेला विजय मिळणार नसल्याचे काँग्रेसच्या उमेदवाराने सांगितले आहे. तर दक्षिण मुंबई मतदार क्षेत्रात काम केल्याने मतदार पुन्हा पारड्यात मत टाकतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.अरविंद सावंतांची संसदेतील उपस्थिती 98 टक्के होती. त्यांनी 279 चर्चेत सहभाग घेतला. तर त्यांनी मतदारसंघ आणि इतर मुद्यांवर 463 प्रश्न विचारले. खासदार फंडाच्या 25 कोटी पैकी त्यांनी 15 कोटी मतदार संघातील कामासाठी खर्च केले आहेत. तर अजूनही 3 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. गेल्या चार वर्षात भाजप शिवसेनेत असलेला वाद आता शमल्याचा दावाही सावंत यांनी केला.

एकेकाळची मोठी बाजारपेठ म्हणूनही हा मतदार संघ ओळखला जातो. काळबादेवी कपडा बाजार, दवा बाजार, लोखंड बाजार, नळ बाजार , मशीद येथील होलसेल व्यापारी तसेच झवेरी बाजारचा जगप्रसिद्ध सोने चांदीच्या कारागिरांचा व्यापार हे येथील वैशिष्ट्य आहे. मात्र या व्यापाऱ्यांच्याही काही समस्यांचे निरसन गेल्या पाच वर्षात झाले नाही.

दक्षिण मुंबईतील कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा, शिवडी या सहा विधानसभा मतदारसंघात युतीचे प्राबल्य आहे. कुलाब्यात राज पुरोहित, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत. तर वरळीत सुनील शिंदे आणि शिवडीत अजय चौधरी हे शिवसेनेचे आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल तर भायखळ्यामध्ये एमआयएमचे वारिस पठाण आमदार आहेत.

या मतदार संघात मुस्लीम मतदारांची संख्याही मोठी आहे. सर्वपक्षीय आमदार या मतदार संघात असले, तरी महमदअली रोड, डोंगरी, भेंडी बाजार, मशीद बंदर या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लीम मतदार आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा हे तीन वेळा तर त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी दोनदा या मतदार संघात विजय मिळवला आहे. मोदी लाटेत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांना हैट्रिक करू दिली नाही. शिवसेनेमधील सून्दोपसुंदी एकमेकांवरील जहरी टीका यामुळे पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details