महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 10, 2021, 8:50 AM IST

Updated : Mar 10, 2021, 8:59 AM IST

ETV Bharat / city

सॅल्युट:आरपीएफ जवानाने वाचवले महिलेचे प्राण; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

धावत्या लोकलमध्ये चढतानाच तोल गेल्याने खाली पडत असलेल्या एका महिला प्रवाशाचा जीव आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने वाचला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून महिलेचे प्राण वाचविणाऱ्या जवानाचे कौतुक केले जात आहे.

सॅल्युट:आरपीएफ जवानाने वाचवले महिलेचे प्राण; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
सॅल्युट:आरपीएफ जवानाने वाचवले महिलेचे प्राण; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढतानाच तोल गेल्याने खाली पडत असलेल्या एका महिला प्रवाशाचा जीव आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने वाचला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून महिलेचे प्राण वाचविणाऱ्या जवानाचे कौतुक केले जात आहे.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 9.19 वाजताच्या दरम्यान मध्य रेल्वेच्या कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रंमाक 2 वर पनवेल लोकल ट्रेन येताच एक महिला प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र यावेळी लगेच लोकल पुन्हा सुरू झाली. यामुळे चढतानाच महिलेचा तोल गेला आणि ती महिला दरवाजला अडकून फरफटायला लागली. यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान सरदारसिंह यांनी लोकलकडे धाव घेतली. तसेच लोकल गार्डला ट्रेन थांबविण्याचे निर्देश देत घसरत जाणार्‍या महिलेला उचलून लोकलमध्ये चढवले. सरदारसिंह यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे या महिलेचा जीव वाचला.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आरपीएफ जवान सरदारसिंह यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सरदारसिंह यांनी सांगितले की, प्रवाशांना सुरक्षित ठेवणे आमचे हे काम आहे. मला हे काम करत असताना समाधान वाटते. प्रवाशांना आवाहन आहे की, धावती लोकल पकडू नये.
उत्कृष्ट कामगिरी
रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की, आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. सरदारसिंह यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिला प्रवाशाचा जीव वाचला आहे. आमचे जवान उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

Last Updated : Mar 10, 2021, 8:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details