महाराष्ट्र

maharashtra

दोन दिवसात राज ठाकरे पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेणार - वसंत मोरे

By

Published : Jun 9, 2022, 5:26 PM IST

मनसेच्या पुणे संघटनेत सध्या अंतर्गत वाद सुरू आहेत. पुण्याचे माजी शहराध्यक्ष व सध्याचे मनसे सरचिटणीस असलेले वसंत मोरे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. त्यामुळेच मोरे समर्थक नाराज होऊन मनसेचा राजीनामा देत आहेत. असाच एक राजीनामा काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांचे खंदे समर्थक निलेश माझिरे यांनी दिला. यावेळी माझीरे यांनी पक्षांतर्गत काही वादांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. मात्र, आता याच पक्ष सोडलेल्या माझीरे यांना घेऊन वसंत मोरे राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मोझीरे यांच्यावर पुणे माथाडी कामदार जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

वसंत मोरे
वसंत मोरे

मुंबई- मनसेच्या पुणे संघटनेत सध्या अंतर्गत वाद सुरू आहेत. पुण्याचे माजी शहराध्यक्ष व सध्याचे मनसे सरचिटणीस असलेले वसंत मोरे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. त्यामुळेच मोरे समर्थक नाराज होऊन मनसेचा राजीनामा देत आहेत. असाच एक राजीनामा काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांचे खंदे समर्थक निलेश माझिरे यांनी दिला. यावेळी माझीरे यांनी पक्षांतर्गत काही वादांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. मात्र, आता याच पक्ष सोडलेल्या माझीरे यांना घेऊन वसंत मोरे राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मोझीरे यांच्यावर पुणे माथाडी कामदार जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याची माहितीही त्यांनी दिली.पुण्यातील मनसेचे जुने व महत्त्वाचे नेतेच अन्याय होत असल्याचे म्हणत राजीनामा देत असल्याने पुण्यातील मनसेच्या अंतर्गत वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. याबाबत वसंत मोरे म्हणाले, "येत्या एक-दोन दिवसांत राज ठाकरे पुण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलून घेणार आहेत. या बैठकीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जे काही वाद आहेत ते स्वतः चर्चा करून मीटवतील."

बोलताना मनसे नेते


निलेशवर अन्याय झाला -या संदर्भात बोलताना वसंत मोरे म्हणाले की, "निलेश यांच्या राजीनाम्यामुळे राज ठाकरे यांनी रात्री फोन करून निलेश माझीरेला घेऊन मुंबईत बोलवून घेतले. त्यांनी निलेशची नाराजी का होती हे समजून घेतले आणि राज ठाकरे यांनी स्वतः निलेशची पुणे माथाडी कामगार जिल्हाध्यक्षपदी निवड केली. राज ठाकरे सर्वांनाच न्याय देतात तसाच त्यांनी निलेश यांनाही दिला. काही बातम्या जाणून बुजून पसरवल्या जात असतात, तशा काही बातम्या आल्या आणि त्या बातम्यांवरून निलेश यांच्यावर कारवाई व्हायला नको हवी होती ती करण्यात आली", असे मोरे यांनी म्हटले आहे.

काही लोकांमुळे होतेवाद -तर माझीरे म्हणाले की, "राज ठाकरेंनी स्वतः मला इथे बोलून घेतले माझे म्हणणे ऐकले आणि त्यांनी माझी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. काही लोकांमुळे वाद होते. मात्र, ते आता मिटलेले आहेत. राज ठाकरे यांनी मला सांगितल तुझ्या ज्या काही अडचणी असतील त्या घेऊन सरळ माझ्याकडे ये. त्यामुळे आता मधले जे काही अडथळे होते ते दूर झालेत. त्यामुळे आता मी पुन्हा एकदा नव्या ताकतीने शहरभर नाहीतर जिल्हाभर काम करायला सुरुवात करणार आहे. मनसेची माथाडी कामगार सेना आता जिल्हाभर पसरवायची आहे. त्यामुळे मी पदभार स्वीकारला असून लवकरच तुम्हाला माझे काम दिसेल." असा विश्वासही माझिरे यांनी व्यक्त केला आहे.

दोनच दिवसांपूर्वी राजीनामा -निलेश हे वसंत मोरे यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जातात. दोनच दिवसांपूर्वी निलेश माझिरे यांची पुणे माथाडी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. निलेश 19 मे रोजी मनसे सोडणार अशा बातम्या महिन्याभरापूर्वी प्रसिद्ध केल्या जात होत्या. त्यामुळे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस राजू वागस्कर यांनी हकालपट्टी केल्याचे निलेश यांनी म्हटले होते.

हेही वाचा -Rajya Sabha Election : अपक्ष आमदार ठरणार 'गेम चेंजर'; महाविकास आघाडी की 'भाजप' कोण साधणार टायमिंग

ABOUT THE AUTHOR

...view details