महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 2, 2021, 4:38 AM IST

ETV Bharat / city

आता रेल्वेतही 'एमटीआरसी'ची यंत्रणा, कळणार रेल्वेची अचूक वेळ

रेल्वेत पहिल्यांदाच मेट्रो आणि मोनो कंट्रोलच्या धर्तीवर पश्चिम रेल्वे मार्गावर 'एमटीआरसी'ची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

आता रेल्वेतही 'एमटीआरसी'ची यंत्रणा
आता रेल्वेतही 'एमटीआरसी'ची यंत्रणा

मुंबई -रेल्वेत पहिल्यांदाच मेट्रो आणि मोनो कंट्रोलच्या धर्तीवर पश्चिम रेल्वे मार्गावर 'एमटीआरसी'ची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. काही तांत्रिक बिघाड झाल्यास, मान्सून काळात लोकल सेवा ठप्प झाल्यास लोकल सेवा कधी सुरू होईल, लोकलच्या वेळापत्रकातील बदलांची अचूक माहिती या यंत्रणेमुळे प्रवाशांना मिळणे सहज शक्य होणार आहे.

संवाद समन्वय साधण्यास मदत

पश्चिम रेल्वेकडून मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन अर्थात (एमटीआरसी) यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड किंवा रेल्वे खोळंबा झाल्यास प्रवाशांना लोकलच्या वेळापत्रकांची माहिती अचूक मिळणार आहे. असा विश्वास पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. या एमटीआरसी यंत्रणेमुळे कंट्रोल रूम आणि प्रवाशांमध्ये संवाद समन्वय साधण्यास मदत होणार आहे.

5.95 कोटींचा खर्च

या यंत्रणेसाठी पश्चिम रेल्वेला 5 कोटी 95 लाखांचा खर्च आला आहे. तसेच या एमटीआरसी यंत्रणेचा फायदा मोटरमन आणि रेल्वेच्या कंट्रोल रूममध्ये असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्याने प्रवाशांचा खोळंबा होतो. रेल्वे जागीच थांबतात, अशावेळी प्रवाशांना माहिती देण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे.

मोबाईल ऍपवर मिळणार माहिती

हे यंत्रणा अत्याधुनिक असल्याने लोकल नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मोबाईल ऍपवर मिळणार आहे. चर्चगेट ते डहाणू दरम्यान 120 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर या यंत्रणाचे जाळे असणार आहे. त्यामुळे रेल्वे रुळाला तडा गेला, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यास, लोकल उशीराने धावत असल्यास त्याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

रेल्वेमध्ये पहिल्यांदाच बसवली अशी यंत्रणा

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी सांगितले की,भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच पश्चिम रेल्वे विभागात एमटीआरसी सुविधा तयार करण्यात आली आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास एमटीआरसी यंत्रणेद्वारे कंट्रोल रूममधील अधिकारी थेट लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांशी संपर्क साधू शकतात. यासह गार्ड प्रवाशांशी, कंट्रोल रूममधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतो. मान्सून काळात लोकल विस्कळीत झाल्यास एमटीआरसीने लोकलचे ठिकाण, लोकलची सेवा कधी सुरु होईल, याची माहिती मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details