महाराष्ट्र

maharashtra

Minister Aditya Thackeray :...अन् पहिल्याच चेंडूवर आदित्य ठाकरेंनी लगावला षटकार

By

Published : Jan 24, 2022, 4:50 PM IST

Updated : Jan 24, 2022, 4:56 PM IST

आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) वरळी मतदारसंघात फिरताना दिसून येत आहेत. दरम्यान, वरळीतील एका मैदानावर आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ठाकरे यांनी यावेळी पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारला. उपस्थितांनी यानंतर टाळ्यांच्या गजरात आदित्य ठाकरेंची वाहवा केली.

क्रिकेट खेळतांना आदित्य ठाकरे
क्रिकेट खेळतांना आदित्य ठाकरे

मुंबई -सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना राजकारणात सक्रीय असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी वरळी क्रिकेटच्या ( Cricket ) मैदानात फटकेबाजी केली. पहिल्याच चेंडूवर सिक्सर ठोकत 'हम भी कुछ कम नही', असा सुचक इशारा विरोधकांना दिल्याचे बोलले जात आहे. रविवारी काही ठिकाणच्या विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर आजही (सोमवारी) सलग दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात फिरताना दिसून येत आहेत. दरम्यान, वरळीतील एका मैदानावर आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ठाकरे यांनी यावेळी पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारला. उपस्थितांनी यानंतर टाळ्यांच्या गजरात आदित्य ठाकरेंची वाहवा केली.

क्रिकेट खेळतांना मंत्री आदित्य ठाकरे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या मे महिन्यापर्यंत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कंबर कसली आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. उमेदवार निवडीपासून अगदी प्रचाराच्या रणनीतीपर्यंत सर्वकाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ठाकरे यांना असतील. भाजपचे कडवे आव्हान आदित्य ठाकरे यांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विकास प्रकल्प कामांचा धडाका सुरु केला आहे. प्रत्येक विभाग स्वतः पिंजून काढत आहेत. आदित्य ठाकरे विधानसभा मतदारसंघात फिरकतच नाहीत, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून केली जाते. मात्र, मुंबईतील प्रचारमोहिमेचा श्रीगणेशा आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून करत विरोधकांना चपराक लगावली आहे.
Last Updated : Jan 24, 2022, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details