मुंबई - हापूस आंबा म्हटले की, डोळ्यासमोर येतो ते रत्नागिरी व देवगडचा हापूस आंबा. मुंबईकरांना रत्नागिरीच्या हापूस आंब्याच्या अस्सल आमरसाची चव चाखण्याची संधी अभिनेते संजच मोने आणि अभिनेत्री सुकन्या यांनी करून दिली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात पहिल्यांदाच या मोने दांपत्यानी आम्र महोत्सवाचे आयोजन केले आहे.
मुंबईकर खवय्यांसाठी आमरस पुरी मेजवानी; शिवाजी पार्कात आम्र महोत्सवाचे आयोजन
कोकणातील आंबे विक्रेत्या शेतकऱ्यांना हातभार लावावा हा या मागचा उद्देश असल्याचे सिने अभिनेते व या महोत्सवाचे आयोजक संजय मोने यांनी सांगितले. या आमरस महोत्सवाला सिने अभिनेते विनय येढेकर, अतुल परचुरे, निर्माता-दिग्दर्शक अजित घुडे यांनी हजेरी लावली.
मुंबईकर खवय्यांसाठी आमरस पुरी मेजवानी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या महोत्सवाला भेट देत, आंबा कापून या आम्र महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. १८ मे व १९ मे हे दोन दिवस शिवाजी पार्कच्या वनिता समाज हॉलमध्ये हा महोत्सव सुरू असणार आहे. कोकणातील आंबे विक्रेत्या शेतकऱ्यांना हातभार लावावा हा या मागचा उद्देश असल्याचे सिने अभिनेते व या महोत्सवाचे आयोजक संजय मोने यांनी सांगितले. या आमरस महोत्सवाला सिने अभिनेते विनय येढेकर, अतुल परचुरे, निर्माता-दिग्दर्शक अजित घुडे यांनी हजेरी लावली.