महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2021, 10:25 AM IST

ETV Bharat / city

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; रस्ते रेल्वे वाहतूक प्रभावित

रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, किंग सर्कल, सायन, अंधेरी सबवे आदी सखल भागात पाणी साचले. सखल भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला.

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस

मुंबई -शहरात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहर विभागापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रस्ते रेल्वे वाहतूक प्रभावित

उपनगरात पावसाचा जोर
मुंबईत रात्री पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तीन तासात मुंबई शहरात 36 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 75 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री 8 ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात मुंबई शहरात 64.45 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 120.67 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 127.16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाणी साचले, वाहतुकीवर परिणाम
रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, किंग सर्कल, सायन, अंधेरी सबवे आदी सखल भागात पाणी साचले. सखल भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसामुळे पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच सायन येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे.
हेही वाचा -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची शुक्रवारी बैठक, उद्धव ठाकरेही राहाणार उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details