महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 2, 2021, 8:57 AM IST

ETV Bharat / city

समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ

समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरत असताना विद्यार्थांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. याबाबत विद्यार्थी संघटनेकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

Extension till May 31 to apply for scholarship scheme
Extension till May 31 to apply for scholarship scheme

मुंबई - समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरत असताना विद्यार्थांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. याबाबत विद्यार्थी संघटनेकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ३० मे २०२१ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करादी असे आवाहन विभागाने केले आहे.

राज्यातील विद्यार्थांना दिलासा -

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडून महाडीबीटी पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. यामध्ये उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनाचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21च्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरत असताना विद्यार्थांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली. त्यानंतर याची दखल घेत विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत ३१ मे, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षण संचलनालयाकडून देण्यात आली आहे.

उच्च शिक्षण संचलनालयाकडून पत्र -

शिष्यवृत्ती योजनांची माहिती नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज केले नसल्याची माहिती उच्च शिक्षण संचलनालयला मिळाली. लाखो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता पात्र असूनही अद्याप अर्ज केलेले नाहीत. अनेक महाविद्यालयांनी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली नाही. अनेक विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनाची माहिती व महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरावा ? हे देखील माहित नाही. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत ३१ मे, २०२१ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती उच्च शिक्षण संचलनालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details