महाराष्ट्र

maharashtra

Aryan Khan Drug Case : अखेर आर्यनला जामीन; 'मन्नत'बाहेर फटाके फोडून सेलिब्रेशन

By

Published : Oct 28, 2021, 2:57 PM IST

Updated : Oct 28, 2021, 10:12 PM IST

Aryan Khan
आर्यन खान

22:10 October 28

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा वकिलांसोबत फोटो

मुंबई -आर्यन खानला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अभिनेता शाहरुख खानने वकिलांची मोठी फौज यासाठी उभी केली होती. जामीन मिळाल्यानंतर शाहरुखने या टीमसोबत फोटो घेतला आहे. तसेच चर्चाही केली आहे. 

20:00 October 28

चाहत्यांकडून 'मन्नत'बाहेर सेलिब्रेशन, फोडले फटाके

मुंबई - आर्यन खानला आज जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी 'मन्नत' या बंगल्याच्या बाहेर फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.  

19:12 October 28

मुनमून धमेचाचे वकील देशमुख यांच्यासोबत साधलेला संवाद

माहिती देताना मुनमून धमेचाचे वकील

मुंबई -आज क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चट आणि मुनमून धमेचा यांना जामीन मंजूर झाला आहे. यावर मुनमून धमेचा यांच्या वकिलांनी ई टीव्ही भारतसोबत संवाद साधला.  

17:41 October 28

न्यायालयाने दिलेल्या अटी -

माहिती देताना वकील

तपासात अडथळा आणू नये, साक्षीदार फोडू नये, परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी न्यायालयात हजर राहावे आदी शर्तीवर हा जामीन देण्यात आला आहे. जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचे वकिलांनी सांगितले.

16:54 October 28

आर्यन खानसह तिघांना जामीन

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी आता ‘मन्नतवर’ होणार हे स्पष्ट झाले आहे.

16:47 October 28

अखेर आर्यन खानला जामीन मंजूर

मुंबई -अखेर आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

16:38 October 28

एनसीबीच्या वकिलाचा युक्तिवाद

अनिल सिंग म्हणाले -आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.

16:31 October 28

अरबाजशिवार आर्यन शिपवरील कोणालाही ओळखत नाही - रोहतगी

मुंबई -आर्यनची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी म्हणतात की, आर्यन खान शिपवरील अरबाजशिवार कोणालाही ओळखत नाही. अचितला चार दिवसांनंतर अटक करण्यात आली.  

16:05 October 28

अरबाजकडे ड्रग असल्याची आर्यनला माहिती होती - एएसजी अनिल सिंग

एएसजी अनिल सिंग - आर्यन खानला अरबाजच्या ताब्यात ड्रग असल्याची माहिती होती. चरस हा त्यांच्याकडे होता. चरस अरबाजकडे असले तरी दोन्हीच्या सेवनासाठी ते होते.

16:02 October 28

समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई -एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे यांना नोटीस दिली जावी. समीर वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने राज्य सरकारला दिले आहेत.  

15:40 October 28

हा खटला ड्रग सापडल्याचा आहे - एएसजी सिंग

एएसजी अनिल सिंग - बचाव पक्ष वैद्यकीय चाचणीबद्दल बोलले. तर ही चाचणी का करावी? आमचा खटला हा ड्रग उपभोगाचा नाही तर ड्रग सापडल्याचा आहे.  

15:24 October 28

आर्यन ड्रग घेत होता, तसेच तो पेडलरच्या देखील संपर्कात होता - ASG

मुंबई -आर्यन खान आणि अरबाज मर्चंट हे लहानपणीचे मित्र आहेत.  आर्यनने त्यावेळी ड्रग जरी घेतले नसले तरी तो त्या पार्टीचा एक भाग होता. तसेच आर्यनने याआधीही ड्रग घेतल्याचे रेकॉर्ड आहेत. तसेच तो ड्रग पेडलरच्या संपर्कात होता, असा युक्तिवाद एएसजी सिंग यांनी केला.

15:17 October 28

समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस अटक करू शकतात, या भीतीने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

15:11 October 28

आर्यन ड्रग पेडलरच्या संपर्कात होता - ASG

एएसजी -गेल्या काही वर्षांपासून तो नियमित ड्रगचा ग्राहक आहे आणि तो ड्रग्ज पुरवत असल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते. तो ड्रग पेडलरच्या संपर्कात होता.

15:02 October 28

जामिनावर सुनावणी सुरू

मुंबई - आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामिनावर सुनावणी सुरू झाली आहे. सध्या NCB चे वकील बाजू मांडत आहेत.

14:59 October 28

मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात दाखल

मुंबई -आर्यन खानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे.

14:36 October 28

जामिनावर थोड्याच वेळात होणार सुनावणी सुरू

मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामिनावर होणारी सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने काल बुधवार (दि.27) पुन्हा पुढे ढकलली. त्यावर आज गुरुवारी(दि.28) सुनावणी होणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या जामिनावर ही सुनावणी सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. मात्र, वेळेत युक्तीवाद पूर्ण न झाल्याने सुनावणी पुढे ढकलली. दरम्यान, आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

...तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही?

या सुनावणीत एनसीबीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हे प्रकरण कोणत्याही षडयंत्राचे नसून व्यक्तीगत सेवनाच्या आरोपांचे आहे असे म्हणणे मांडले आहे. दरम्यान, ड्रग्ज सेवन झाले होते, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न एनसीबीकडे उपस्थित करण्यात आला आहे.

कायद्यानुसार अटकेसाठी वस्तूस्थिती नोंदवावी लागते

एनसीबीच्या अटक नोटीसीमध्ये मुद्दे वेगवेगळ्या स्वरुपाचे मांडण्यात आले आहेत. कायद्यानुसार अटकेसाठी वस्तूस्थिती नोंदवावी लागते. अटकेचा अधिकार समजून घेण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ५० समजून घ्यावे लागते. तसेच, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या अटकेबाबत माहिती दिली पाहिजे. आणि अटक करताना त्या व्यक्तीला जामिनाचा अधिकार असतो. भारतीय संविधानाचे कलम २२ हे कलम २१ मधील जीवनाचा अधिकारावर अवलंबून आहे. असही रोहतगी म्हणाले आहेत.

माहिती न देता माझी दिशाभूल करत आहेत

दरम्यान, माझ्याकडे एनसीबी उल्लेख करत असलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची तपशील नाही. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. एनसीबीकडे त्या चॅटसह जप्त केलेल्या गोष्टींचा तपशील आहे. पण ते त्याविषयी माहिती न देता माझी दिशाभूल करत आहेत. त्यांनी जप्त केलेल्या गोष्टी आर्यन किंवा अरबाजकडे सापडल्या असे कुणालाही वाटू शकते. पण प्रत्यक्षात आर्यनकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही असही रोहतगी म्हणाले आहेत.

Last Updated : Oct 28, 2021, 10:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details