महाराष्ट्र

maharashtra

बोरिवलीत तृतीयपंथीयाची हत्या; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Jul 29, 2021, 8:40 PM IST

बोरिवलीतील राम मंदिर सिग्नल जवळ बुधवारी रात्री एका तृतीयपंथीयांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

transgender murder mumbai Borivali
तृतीयपंथीय हत्या मुंबई बोरिवली

मुंबई - बोरिवलीतील राम मंदिर सिग्नल जवळ बुधवारी रात्री एका तृतीयपंथीयांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील सर्व तृतीयपंथीयांनी निर्वस्त्र होऊन रास्ता रोको करत वाहतूक काही काळ बंद केली. पोलिसांची मध्यस्थी आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तृतीयपंथीयांनी मार्ग मोकळा केला. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त

हेही वाचा -सरनाईकांकडून सोमैय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल, चोराच्या उलट्या बोंबा म्हणत सोमैयांचा पलटवार

तुतीयपंथीयाचा मृत्यू -

घटनेनंतर तृतीयपंथीयांनी निर्वस्त्र होत रस्ता रोको केला. यामुळे या भागात वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता. या बाबतची माहिती पोलिसांना मिळताच एम.एच.बी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि डीसीपी विशाल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तृतीयपथीयांना समजावले आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान जखमी अवस्थेत त्या तृतीयपंथीयास जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

दोन जणांना घेतले ताब्यात -

तृतीयपंथीयांच्या दोन गटात पैशांवरून वाद झाला होता. तृतीयपंथीयांच्या हत्येप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

हेही वाचा -केंद्राने गुजरातला 1 हजार कोटींची मदत केली होती, तशीच महाराष्ट्रालाही करावी- अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details