महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra corona update : कोरोनाचा धोका वाढला,  राज्यात 24 तासात कोरोनाचे 1885 नवे रुग्ण

By

Published : Jun 14, 2022, 10:47 AM IST

महाराष्ट्रात नवे गेल्या 24 तासांत 1885 कोरोना रुग्ण आढळले आहेत. 774 जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर एका मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 17,480 रुग्ण आहेत. देशातही कोरोनाचे रुग्ण अचानकपणे वाढत असल्याचे दिसत आहे.

corona
corona

मुंबई -महाराष्ट्रात नवे गेल्या 24 तासांत 1885 कोरोना ( Maharashtra Corona ) रुग्ण आढळले आहेत. 774 जण कोरोनातून ( Corona ) बरे झाले आहेत, तर एका मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 17,480 रुग्ण आहेत.

नव्या व्हेरिएंटचे चार रुग्ण - राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. 24 तासांमध्ये 1885 रुग्ण वाढले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. 774 जणांना कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 3 रुग्ण हे बीए.4 आणि एक रुग्ण बीए.5 या नव्या व्हेरिएंटचा आढळला आहे. या सर्वांवर घरीच उपचार सुरू आहेत.

देशात रुग्णवाढ सुरू - देशात कोरोनाग्रस्तांची वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, केरळसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. देशभरात गेल्या दोन दिवसांत 8 हजार 84 नव्या कोनाग्रस्तांची नोंद झाली असून त्यापैकी महाराष्ट्रात ( Maharashtra Corona Update ) 2 हजार 946 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुलांच्या कोरोना लक्षणांवर संस्थाचालकांनी लक्ष द्यावे - 15 जून पासून राज्यभरातल्या शाळा या सुरु आहेत. शाळेत मुलांच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही गोष्ट आडवी येणार नाही. मात्र, शाळेत येणाऱ्या या मुलांच्या कोरोनाच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे.

हेही वाचा -Guwahati Landslide : गुवाहाटी शहरात भूस्खलनात चौघांचा मृत्यू.. जोरदार पाऊस

ABOUT THE AUTHOR

...view details