महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 26, 2021, 3:10 PM IST

Updated : Mar 26, 2021, 3:27 PM IST

ETV Bharat / city

कोल्हापूरकरांनी चाखली सीडलेस जम्बो द्राक्षांची चव

दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित केलेल्या या द्राक्ष महोत्सवात यंदा कोल्हापूरकरांना सिडलेस जम्बो द्राक्षांची चव चाखायला मिळणार आहेत.

Kolhapur Grapes Festival
Kolhapur Grapes Festival

कोल्हापूर - उत्पादक ते थेट ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021चे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित केलेल्या या द्राक्ष महोत्सवात यंदा कोल्हापूरकरांना सिडलेस जम्बो द्राक्षांची चव चाखायला मिळणार आहेत. हा महोत्सव 30 मार्चपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे.

दसरा चौकात आयोजन

कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे द्राक्ष महोत्सव 2021चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जम्बो सीडलेस द्राक्षे खास आकर्षण

या द्राक्ष महोत्सवात ग्राहकांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाका, माणिकचमन, कृष्णा सीडलेस, आर के सुपर, शरद सीडलेस आदी जातींची द्राक्ष उपलब्ध आहेत. वैशिष्ट्य म्हणजे मिरज येथील सोनी गावच्या दिलीप पाटील, प्रतीक लेंगरे यांच्या शेतातील सीडलेस जम्बो द्राक्ष या महोत्सवातील आकर्षण आहेत. किलोमागे तीनशे रुपयांचा दर या द्राक्षांना आहे. कोविड-19मुळे शेतकरी वर्गात शेतीमाल उत्पादन विक्रीबाबत चिंतेचे वातावरण होते. विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे आर्थिक नुकसान या वर्षभराच्या कालावधीत झाले होते. त्यामुळे शेतकरी उत्पादकांच्या मालाची थेट विक्री ग्राहकांपर्यंत होण्याच्या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसंचालक व सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी सांगितले. मागील महिन्यात गोवा येथेही द्राक्षे महोत्सव भरवण्यात आला होता. त्याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना मिळाला. कोल्हापुरातील द्राक्ष महोत्सवातील ग्राहकांनी भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुले यांनी केले आहे.

Last Updated : Mar 26, 2021, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details