महाराष्ट्र

maharashtra

पाच अंध आणि अपंग कुष्ठरोगी रुग्णांची कोरोनावर मात; फुलांचा वर्षाव करत दिला डिस्चार्ज

By

Published : May 20, 2021, 7:50 PM IST

पाच अंध आणि अपंग कुष्ठरोगी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना फुलांचा वर्षाव करत कोविड केअर सेंटरमधुन डिस्चार्ज देण्यात आला.

Five blind and disabled leprosy patients have overcome corona in Kolhapur
पाच अंध आणि अपंग कुष्ठरोगी रुग्णांची कोरोनावर मात; फुलांचा वर्षाव करत दिला डिस्चार्ज

कोल्हापूर - शहरातील व्हिजन चॅरीटेबल ट्रस्टच्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या पाच अंध आणि दिव्यांग कुष्ठरोगी रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वी मात केली. कोल्हापुरात दहा दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी बेड उपलब्ध होताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्व अडचणींवर मात करून अखेर त्यांना संताजी बाबा घोरपडे यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या व्हिजन चॅरीटेबल ट्रस्ट या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये एका विशेष कक्षामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर योग्य औषधोपचार केल्यानंतर आज अखेर या पाच अंध आणि दिव्यांग कुष्ठरोग्यांनी कोरोनावरती मात केली आहे. या रुग्णांवर फुलांचा वर्षाव करून आज डिस्चार्ज देण्यात आला.

पाच अंध आणि अपंग कुष्ठरोगी रुग्णांची कोरोनावर मात; फुलांचा वर्षाव करत दिला डिस्चार्ज

हेही वाचा -'ब्लॅक'नंतर आता 'व्हाईट फंगस'ची भीती! बिहारमध्ये आढळले चार रुग्ण

रुग्णांना अश्रू अनावर -

अंध आणि दिव्यांग कुष्ठरोगी रुग्णांना डिस्चार्ज देताना त्या सर्वांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महापालिका उपायुक्त निखिल मोरे, व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजीराव घोरपडे मोरया हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टर संगीता निंबाळकर, आयसोलेशन हॉस्पिटलच्या अर्पिता खैरमोडे, अमर भोसले, संग्राम मोरे, शाहू भोसले यांनी दिव्यांग कुष्ठरोग्यांना गुलाब पुष्प देऊन निरोपही दिला. यावेळी या सर्व दिव्यांग कुष्ठरोग्यांना अश्रू अनावर झाले. शिवाय आपली योग्य देखभाल केली. घरातील व्यक्तिप्रमाणे आम्हाला सांभाळले याबद्दल कोविड सेंटचे आभार सुद्धा मानले.

हेही वाचा -मोदी तर दिलदार नेते, महाराष्ट्रालाही १५०० कोटी रुपये देतील - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details