महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 4, 2020, 7:33 PM IST

ETV Bharat / city

अहमदनगर अत्याचारित पीडिता मारहाण प्रकरण: आरोपीची तक्रार रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्यात चर्चेत असलेल्या पाथर्डी बलात्कार पीडिता आणि तिच्या पतीला मारहाण झालेल्या प्रकरणात पीडितेने दाखल केलेली तक्रार रद्द करावी, अशी मागणी आरोपीने उच्च न्यायालयात केली होती. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी ही याचिका फेटाळली.

high court dismissed the plea of the accused
अहमदनगर अत्याचारित पीडिता मारहाण प्रकरण, आरोपीची तक्रार रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

अहमदनगर -राज्यात सध्या चर्चेत असलेल्या पाथर्डी येथील बलात्कार पीडिता आणि तिच्या पतीचा मारहाण झालेल्या प्रकरणात २०१६ साली पीडितेने दाखल केलेली बलात्काराची तक्रार रद्द करावी, अशी मागणी आरोपीने केली होती. ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळली. मूळ अत्याचाराच्या घटनेत सहा आरोपी असून त्यातील एक आरोपी बंडू मतकर याने तक्रारदाराने खोटा बनाव करून आमच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याने ही तक्रार रद्द करावी, अशा मागणीची याचिका औंरगाबाद खंडपीठात दाखल केली होती.

अहमदनगर अत्याचारित पीडिता मारहाण प्रकरण, आरोपीची तक्रार रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

हेही वाचा -अहमदनगर पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

या याचिकेवर सुनावणी होऊन आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याचे तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपोपी बंडू मतकर याची याचिका फेटाळली आहे. वैद्यकीय अहवालात पीडितेवर अत्याचार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा -अहमदनगर अत्याचार; प्रकरण तपासासाठी 'सीआयडी'कडे द्यावे, पीडितांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details