नवी दिल्ली- कोरोनाचा संसर्ग हा अर्थव्यवस्थेच्या विकासदरालाही (जीडीपी) होणार आहे. फिच या पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ०.८ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या संकटात जागतिक मंदी आणि टाळेबंदीने भारताचा विकासदर घसरणार असल्याचे फिचने म्हटले आहे. यापूर्वी फिचने चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर हा ४.९ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता.
फिचने एप्रिल ते जूनमध्ये देशाचा विकासदर हा चालू आर्थिक वर्षात सलग दोन तिमाहीत वृद्धीदर हा उणे राहणार असल्याचे म्हटले आहे. एप्रिल-जूनमध्ये विकासदर हा ०.२ टक्क्यांनी घसरणार (उणे) राहणार असल्याचे म्हटले आहे. तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान विकासदर हा ०.१ टक्क्यांनी घसरणार (उणे) असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वर्ष २०२० च्या शेवटच्या तिमाहीत विकासदर हा १.४ टक्के होईल, असा फिचने अंदाज व्यक्त केला आहे.