महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2020, 4:24 PM IST

ETV Bharat / business

जीवनावश्यक वस्तूत समावेश होवूनही सॅनिटायझरवरील जीएसटी कायम राहणार

कोरोना महामारीमुळे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालायने सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केला आहे. त्यानंतर मद्य व साखर उद्योगामधून सॅनिटायझरचा समावेश औषधी पदार्थांत करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

संग्रहित
संग्रहित

नवी दिल्ली– कोरोनाच्या संकटकाळात सॅनिटायझरवरील जीएसटीचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, केंद्रीय वित्त मंत्रालयाने अल्कोहोलचा वापर करून तयार केलेल्या सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी यापुढेही लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सॅनिटायझर हे साबणासारखे जंतूनाशक आहेत. ते औषधी पदार्थ नाही, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना महामारीमुळे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालायने सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केला आहे. त्यानंतर मद्य व साखर उद्योगामधून सॅनिटायझरचा समावेश औषधी पदार्थांत करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. औषधी पदार्थांवर 12 टक्के जीएसटी लागू होतो. सध्या सॅनिटायझरवर 18 टक्के जीएसटी लागू आहे. सॅनिटायझर हे साबणासारखे जंतूनाशक आणि सूक्ष्म जीवाणुंना प्रतिबंध करणाऱ्या द्रव्यांसारखे असल्याचे वित्तीय मंत्रालयाने म्हटले आहे. सॅनिटायझर तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून रसायने, पॅकिजिंग माल व इतर सेवांचा वापर होतो. त्यांच्यावरही 18 टक्के जीएसटी लागू आहे. जर सॅनिटायझरवरील जीएसटी कमी केला तर स्थानिक उत्पादकांचे नुकसान होणार असल्याचे वित्तीय मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, अल्कोहोलचा वापर होणाऱ्या स्वच्छता उत्पादनांवर 18 टक्के जीएसटी लागू होणार असल्याचे गोवा ऑथोरिटी फॉर अडव्हान्स रुलिंगने (एएआर) यापूर्वी स्पष्ट केले होते. सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूत समावेश झाला आहे. पण, हा निकष जीएसटीमधील वर्गवारी बदलण्यासाठी होवू शकत नाही, असे एएआरने एका प्रकरणातील निकालात म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details