महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 19, 2019, 1:44 PM IST

ETV Bharat / business

सत्ता आल्यास स्टार्टअपच्या गुंतवणुकीवरील अँजल कर काढून टाकू - राहुल गांधी

सध्याची जीएसटी ही तांत्रिकदृष्ट्या बहुस्तरीय कररचना झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बँकिंग व्यवस्थेत मोठ्य़ा प्रमाणात एकाधिकारशाही असल्याची त्यांनी टीका केली. लघु आणि मध्यम उद्योगांना बँकिंग व्यवस्था खुली करणे ही प्राथमिक आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

संग्रहित

बंगळुरू - लोकसभेत काँग्रेसचा विजय झाल्यास स्टार्टअपच्या गुंतवणुकीवरील अँजल कर काढून टाकू, असे आश्वासन राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी दिले. बंगळुरूमधील आंत्रेप्रेन्युअरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही बहुस्तरीय कररचना झाल्याची टीका त्यांनी केली.

अँजल कर हास्टार्टअपच्या तत्वज्ञानाला संपविणारी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. पुढे ते म्हणाले, की आम्ही सत्तेत आल्यास या करापासून स्टार्टअपला मुक्त करणार आहोत. राहुल यांनी नोकऱ्या, वस्तू व सेवा कर, बँकिंग व्यवस्था, लघु आणि मध्यम व्यवसाय अशा प्रश्नांविषयी टेकपार्कमध्ये व्यावसायिक समुदायाबरोबर (बिझनेट कम्युनिटी ) चर्चा केली.

जीएसटी म्हणजे आपत्ती - राहुल गांधी

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जीएसटीची अंमलबजावणी ही आपत्तीसारखी असल्याची टीका राहुल गांधींनी केली. जेव्हा आम्ही जीएसटी आणणार होतो, तेव्हा त्याची चाचणी घेण्याबाबत खात्री होती. मात्र, सध्याची जीएसटी ही तांत्रिकदृष्ट्या बहुस्तरीय कररचना झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बँकिंग व्यवस्थेत मोठ्य़ा प्रमाणात एकाधिकारशाही असल्याची त्यांनी टीका केली. लघु आणि मध्यम उद्योगांना बँकिंग व्यवस्था खुली करणे ही प्राथमिक आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.


ABOUT THE AUTHOR

...view details