महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 4, 2020, 3:49 PM IST

ETV Bharat / business

पिनाका शस्त्रास्त्र यंत्रणा पुरविण्याचे एल अँड टीला कंत्राट; संरक्षण दलाने दिली ऑर्डर

पिनाका लाँचर, बॅटरी कमांड पोस्ट आणि अभियांत्रिकीसाठी सहाय्य ठरणारे पॅकेज चार रेजिमेंट एल अँड टी संरक्षण मंत्रालयाला पुरविणार आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

संग्रहित-पिनाक
संग्रहित-पिनाक

नवी दिल्ली - अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी लार्सन अँड टुर्बोला (एल अँड टी) भारतीय संरक्षण मंत्रालयाचे पिनाका यंत्रणा पुरविण्याचे कंत्राट मिळाले आहे.

पिनाका लाँचर, बॅटरी कमांड पोस्ट आणि अभियांत्रिकीसाठी सहाय्य ठरणारे पॅकेज चार रेजिमेंट एल अँड टी संरक्षण मंत्रालयाला पुरविणार आहे. ही माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. या कंत्राटाची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही. मात्र, कंत्राटाची किंमत १ हजार ते २,५०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा-आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँकेचा परवाना रद्द; बँकिंग कंपनीचा दर्जा संपुष्टात

पिनाका लाँचिंग यंत्रणा ही कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानातून तयार केली आहे. पिनाका डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ऑफ डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑरगायनेझशन ही एल अँड टीच्या मालकीची आहे. या कंपनीने तयार केलेल्या पिनाका यंत्रणेत सर्व वातावरणात वापरण्यात येऊ शकणारे उच्च तंत्रज्ञान आहे. यापूर्वी पिनाका यंत्रणा ही संरक्षण मंत्रालयाच्या ऑर्डरनंतर दोन रेजिमेंटला दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-ग्रामीण भागात रोजगार मिळेना; देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details