महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 26, 2019, 4:29 PM IST

ETV Bharat / business

इन्स्टाग्राममधील सुरक्षेची त्रुटी 'त्याने' दुसऱ्यांदा शोधली, २१ लाखानंतर पुन्हा ७ लाखांचे बक्षीस

लक्ष्मण मुथियाह यांना इन्स्टाग्राममधील सुरक्षा त्रुटी शोधून दाखविल्याबद्दल इन्स्ट्राग्रामची मालकी असलेल्या फेसबुकने २१ लाख (३० हजार डॉलर) दिले होते.  त्यांनी काढलेली दुसरी त्रुटी ही पहिल्या त्रुटीप्रमाणेच  आहे.

संग्रहित - इन्स्टाग्राम

चेन्नई - वापरकर्त्याचा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी फेसबुककडून विविध उपाययोजना करतात. सुरक्षा त्रुटी शोधून काढणाऱ्याला रोख बक्षीस देण्यात येते. चेन्नईमधील सुरक्षा संशोधक लक्ष्मण मुथियाह यांनी इन्स्टाग्राममधील सुरक्षा त्रुटी दुसऱ्यांदा शोधून काढली आहे. यावेळी त्यांना ७ लाख (१० हजार डॉलर) रुपये मिळाले आहेत.


यापूर्वी लक्ष्मण मुथियाह यांना इन्स्टाग्राममधील सुरक्षा त्रुटी शोधून दाखविल्याबद्दल इन्स्ट्राग्रामची मालकी असलेल्या फेसबुकने २१ लाख (३० हजार डॉलर) दिले होते. त्यांनी काढलेली दुसरी त्रुटी ही पहिल्या त्रुटीप्रमाणेच आहे.

इन्स्टाग्राम वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही अकाउंट हॅक करता येत असल्याचे लक्ष्मण यांनी जुलैमध्ये दाखवून दिले होते. ही त्रुटी फेसबुकने दूर केली आहे. त्रुटी शोधून काढल्याबद्दल ७ लाख रुपये कंपनीने दिल्याचे लक्ष्मण यांनी सांगितले.

इन्स्टाग्रामच्या सर्व्हरकडून वापरकर्त्याचा पासवर्ड रिसेट करता येतो, हे त्यांनी दाखविले होते. त्यासाठी वेगवेगळ्या वापरकर्त्याचे पासवर्ड वापरूनही त्यांनी दाखविले होते. अशा प्रकारामुळे इन्स्ट्राग्रामचे अकाउंट हॅक होते, हे त्यामधून दिसून आले. फेसबुकने त्यांना पत्र लिहून त्यांच्या कामगिरीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details