महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2020, 11:45 AM IST

ETV Bharat / business

विमान प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेला कर्मचारी हा दिल्लीमधील रहिवाशी असल्याचे लुधियानाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रवासी दिल्लीहून लुधियानामध्ये २५ मे रोजी आला होता.

एअर इंडिया
एअर इंडिया

नवी दिल्ली - एअर इंडियात सुरक्षा कर्मचारी असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याने 'दिल्ली ते लुधियाना' असा विमान प्रवास केला होता. कोरोनाची लागण झालेला कर्मचारी हा दिल्लीमधील रहिवाशी असल्याचे लुधियानाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रवासी दिल्लीहून लुधियानामध्ये २५ मे रोजी आला होता. याच दिवशी चेन्नईवरून कोईम्बतूरला जाणाऱ्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीनंतर आढळून आले आहे. आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल वगळता देशामध्ये सर्वत्र विमान वाहतूक सेवा सुरू झाली आहे.

हेही वाचा-रिलायन्सकडून २०० शहरांमध्ये जिओमार्टची सेवा लाँच

दरम्यान, विमान प्रवाशांना विमानतळावर स्क्रीनिंग बंधनकारक करणे बंधनकारक आहे. तसेच त्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा-वैद्यकीय व्यवसायिकांना टाटा ट्रस्ट देणार प्रशिक्षण; दोन संस्थांशी करार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये २५ मार्चपासून विमान वाहतूक सेवा बंद केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवाही बंद करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details