महाराष्ट्र

maharashtra

लुगजाई टेकडीवर सापांना जीवनदान देऊन नागपंचमी साजरी

By

Published : Jul 25, 2020, 9:35 PM IST

दारव्हा-आर्णी मार्गावरील महागाव येथील वन विभागाच्या क्षेत्रात असलेल्या टेकडीवर प्राचीन श्री लुगजाई माता मंदिर आहे. नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या या मंदिर परिसरात एका दगडावर श्री नागदेवता कोरलेले आहेत. दरवर्षी नागपंचमीला गावातील सर्प मित्र मंडळ गावात पकडलेल्या सापांना या टेकडीवर सोडून जीवनदान देतात.

Snake released lugjai hill
Snake released lugjai hill

यवतमाळ- आपला देश हा विविध संस्कृतीने नटलेला आहे. येथे विविध सण उत्सव आनंदाने साजरे केले जातात व त्या प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व असते. दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथेही आगळी वेगळी परंपरा जपली जात आहे. यावर्षीसुद्धा येथील लुगजाई टेकडीवर सापांना जीवनदान देवून नागपंचमीला परंपरा जपण्यात आली आहे.

दारव्हा-आर्णी मार्गावरील महागाव येथील वन विभागाच्या क्षेत्रात असलेल्या टेकडीवर प्राचीन श्री लुगजाई माता मंदिर आहे. नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या या मंदिर परिसरात एका दगडावर श्री नागदेवता कोरलेले आहेत. दरवर्षी नागपंचमीला गावातील सर्प मित्र मंडळ गावात पकडलेल्या सापांना या टेकडीवर सोडून जीवनदान देतात. अशाप्रकारे आजवर शेकडो सापांना जीवनदान देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात नागरिकांची गर्दी ओसरली असली तरी, सापांना जीवनदान देवून परंपरा जपण्यात आली आहे.

सापांना जीवनदान देण्यात सर्प मित्र मंडळाचे प्रमुख शेषराव महाराज, बंडू बिहाडे, किरण बिहाडे, पद्माकर भगत, भारत बोरचाटे, दिनेश ताजने, मयूर दुधे, दत्ता राजने, गोपाल बिहाडे, वसंत इंगोले या सर्प मित्रांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शासनाने निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन मंदिराकडे लक्ष दिल्यास मंदिराला नवे वैभव प्राप्त होईल आणि पर्यटनही वाढेल. मंदिरावर जाण्यासाठी रस्ता तयार करावा अशी, मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details