महाराष्ट्र

maharashtra

नागपुरात 24 तासात 95 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; धोका अजूनही टळला नसल्याचे स्पष्ट

By

Published : Jun 20, 2020, 9:52 PM IST

आज पॉझिटिव्ह आलेले सर्वाधिक रुग्ण पाचपवली विलगीकरण सेंटर येथील संशयित आहेत. तर उर्वरित रुग्ण मोमीनपुरा, गणेशपेठ, रामदासपेठ, उप्पलवाडी येथील अहेत. तर यामध्ये काही ग्रामीण भागातील रुग्णांचा देखील समावेश आहे.

Hospital nagpur
Hospital nagpur

नागपूर- गेल्या 24 तासात नागपूर येथे तब्बल 95 कोरोना संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 266 झाली आहे. नागपुरात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून हा सर्वात मोठा आकडा आहे. यापैकी 32 कोरोना पॉझिटिव्ह संशयित्यांचा अवहाल काल रात्री उशिरा आला होता, तर आज दिवसभरात तब्बल 61 रुग्णांची भर पडलेली आहे.

या संपूर्ण आठवड्यात कोरोनाबाधित रुग्ण पुढे येण्याचे प्रमाण कमी होऊन कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली होती. मात्र, 24 तासात नव्याने कोरोनाचे 95 रुग्ण वाढल्याने धोका अजूनही कमी झाला नसल्याचे अधोरेखित झाले आहे.

आज पॉझिटिव्ह आलेले सर्वाधिक रुग्ण पाचपवली विलगीकरण सेंटर येथील संशयित आहेत. तर उर्वरित रुग्ण मोमीनपुरा, गणेशपेठ, रामदासपेठ, उप्पलवाडी येथील अहेत. तर यामध्ये काही ग्रामीण भागातील रुग्णांचा देखील समावेश आहे.

याशिवाय आत्तापर्यंत 824 रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत. तर अत्ता पर्यंत 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या नागपुरात 442 रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि कामठी येथील मिलिटरी रुगणालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details