महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 11, 2021, 10:10 PM IST

Updated : Jan 12, 2021, 5:03 PM IST

ETV Bharat / bharat

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीला अपघात; पत्नीसह पीएचा मृत्यू

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाचा अपघात झाला असून यात त्यांच्या पत्नीचा व स्वीय सहायकाचा मृत्यू झाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

पणजी/बंगळुरू- केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोटारीचा अपघात झाला आहे. यात त्यांची पत्नी विजया नाईक व त्यांच्या स्वीय सहायकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात केंद्रीय मंत्र्यासह चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला तालुक्यातील होसकंबी गावाजवळ झाला.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची मोटारला अपघात

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार

नाईक यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. श्रीपाद नाईक यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले. अपघातात जखमी झालेले नाईक यांना त्वरित वेगवान उपचार मिळण्याकरता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली. नाईक यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. त्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे. नाईक यांनी उपचारातून बरे व्हावे, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांना रुग्णालयात हलविताना

नाईक यांची प्रकृती स्थिर

अपघातामध्ये जखमी झालेले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची तब्येत धोक्याबाहेर आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नाईक यांच्यावर दोन लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी रात्री बोलताना दिली.

छायाचित्र

दिल्लीला हलवण्याची गरज नाही

केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिल्लीत उपचारासाठी हलविण्याची गरज नसल्याचे प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उत्तर कर्नाटकात झालेल्या कार अपघातात केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णवाहिकेतून सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमार गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणण्यात आले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची मोटारला अपघात

देवदर्शनाला जाताना झाला अपघात

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे सपत्नीक देवदर्शनासाठी जात असताना सोमवारी संध्याकाळी उत्तर कर्नाटकातील येल्लापूर येथे त्यांच्या कारला अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि स्वीय सहाय्यक यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चारजण जखमी झाले. यामध्ये नाईक यांचाही समावेश असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना यल्लापूर येथून विशेष रुग्णवाहिकेद्वारे गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रुग्णालय परिसरात समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. गोमेकॉ परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

छायाचित्र

पंतप्रधानांसह केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा-

श्रीपाद नाईक यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले. अपघातात जखमी झालेले नाईक यांना त्वरित वेगवान उपचार मिळण्याकरता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची मोटारला अपघात

हेही वाचा-दिंडोरी तालुक्यात पिकअपच्या धडकेत दोन भाविक ठार; एक गंभीर

हेही वाचा-बुलडाण्यात चारचाकी-दुचाकीच्या जोरदार धडकेत पती-पत्नी ठार!

Last Updated : Jan 12, 2021, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details