मेष : 18 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्र व स्नेह्यांसह आनंददायी प्रवास कराल. त्यांच्याकडून भेटवस्तू प्राप्त झाल्याने आपणास आनंद होईल.
वृषभ : 18 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचे फळ असमाधानकारक असेल. त्यामुळे नैराश्य येईल. घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
मिथुन :18 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. पत्नी व संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल.
कर्क : 18 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आई कडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. धन व प्रसिद्धी वाढेल.
सिंह : 18 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापॅट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नकारात्मक विचार, वर्तन व नियोजन ह्या पासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या : 18 जानेवारी, 2024 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. सरकार विरोधी कृतीमुळे समस्या निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.