महाराष्ट्र

maharashtra

बळजबरीने पैशांची वसुली केल्याप्रकरणी ८ तृतीयपंथीयांना अटक

By

Published : Dec 27, 2020, 10:36 AM IST

आरोपींनी तक्रारदारास अश्लील भाषा वापरत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दहशत निर्माण करून त्यांना भयभीत केले.

transgenders
transgenders

हैदराबाद - तेलंगाणा पोलिसांनी शनिवारी सायबराबाद भागात बळजबरीने पैशांची वसुली केल्याप्रकरणी दोन पुरुष ऑटोरिक्षा चालकांसह आठ तृतीयपंथीयांना अटक केली.

अश्लील भाषा वापरत शिवीगाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबर पंचगम चलपती यांनी लेखी तक्रार दिली, की मुलाच्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आठ अज्ञात तृतीयपंथीय त्यांच्या फ्लॅटमध्ये ऑटोरिक्षाने आले आणि जबरदस्तीने २० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला धमकावले, की जर त्यांनी त्यांची मागणी पूर्ण केली नाही, तर बदनामी करतील. मात्र तक्रारदाराने त्यांची मागणी नाकारली. त्यानंतर आरोपींनी त्यांना अश्लील भाषा वापरत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दहशत निर्माण करून त्यांना भयभीत केले. तक्रारदार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही तृतीयपंथीयांनी पैसे मागितले. त्यानंतर घाबरून तक्रारदाराने त्यांना 16, 500 रुपये दिले, "असे नमूद केले आहे.

आरोपींनी केला परिसराचा अभ्यास

पोलिसांनी सांगितले, की आरोपींनी या परिसराचा अभ्यास केला होता. लग्न, घरगुती कार्यक्रम, वाढदिवसासारख्या कामांच्या तारखांची माहिती एकत्रित केली आणि संबंधितांकडून पैसे उकळले. साक्षी उर्फ सहाना, मलकापूर रईश, मुनावथ राकेश उर्फ सावित्री, रामुलु गगनम, कप्पेरा बाबिया, तुरापती नरसिमुलु, तुरापती लिंगम, तुरापती यदैया आणि करण गुप्ता आणि मोहद मासी असे दोन पुरुष ऑटोरिक्षा अशी आरोपींची नावे आहेत. यांनी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांना बळजबरीने पैशांची मागणी करत धमकावले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details